इंटरनॅशनल कन्सोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव जर्नालिस्ट्स (ICIJ), पत्रकारांची आंतरराष्ट्रीय संस्था आणि जगभरातील मीडिया संघटनांनी मोठ्या श्रीमंतांच्या गुप्त व्यवहाराबाबत महत्त्वपूर्ण खुलासे केले आहेत. यामध्ये, 35 देशांच्या वर्तमान आणि माजी राष्ट्रप्रमुखांपासून ते शेकडो उद्योगपती, खेळाडू, सेलिब्रिटी,यांच्याकडुन त्यांची संपत्ती आणि पैशाचे व्यवहार लपवण्याचा उल्लेख केला आहे.या लीक झालेल्या डेटाला पेंडोरा पेपर्स (Pendora Paper) असे नाव देण्यात आले आहे. असे सांगण्यात आले आहे की पेंडोरा पेपर्स सुमारे 1 कोटी 19 लाख गुप्त फायलींचा समूह आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये भारतीय नागरिकत्व असलेली 380 नावेही उघड झाली आहेत.(Pendora Paper Scam know all abut this scam)
काय आहे पेंडोरा पेपर्स प्रकरण ?
पेंडोरा पेपर्समध्ये 14 कॉर्पोरेट सर्व्हिस फर्मने लीक केलेल्या एकूण 1.19 कोटी गुप्त फायली आहेत. या 14 सेवा कंपन्यांनी स्थापन केलेल्या जवळपास 29,000 ऑफ-द-शेल्फ कंपन्या आणि खाजगी ट्रस्टची नावे या फायलींमध्ये आहेत,ज्या कंपन्या कर वाचवण्यासाठी तयार करण्यात आल्या होत्या . या ऑफ-द-शेल्फ कंपन्या केवळ टॅक्स हेवन देशांमध्ये म्हणजेच कर न आकारणारे देश नाही तर परंतु सिंगापूर, न्यूझीलंड आणि अमेरिका सारख्या देशांमध्ये देखील रेकॉर्ड लपवण्यासाठी तयार केल्या गेल्या आहेत.
पेंडोरा पेपर्समध्ये कोणत्या भारतीयांची नावे आहेत?
या साऱ्या समोर आलेल्या कागदपत्रांमध्ये, अनेक बड्या लोकांच्या खाजगी ट्रस्टद्वारे परदेशात ठेवलेल्या मालमत्ता आणि गुंतवणुकीशी संबंधित खुलासे करण्यात आले आहेत. यामध्ये रोख, शेअर्स आणि रिअल इस्टेटमध्ये केलेल्या गुंतवणुकीची माहिती देखील समाविष्ट आहे. पेंडोरा पेपर्समध्ये नावाजलेल्या 380 भारतीयांपैकी 60 प्रमुख व्यक्ती आणि कंपन्यांची कागदपत्रे द इंडियन एक्सप्रेस मीडिया ग्रुपने पडताळली आहेत.अशी माहिती देखील समजत आहे.
अनिल अंबानी ते नीरव मोदी आणि किरण मजुमदार शॉ यांच्या उद्योगपतींची नावे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पेंडोरा पेपर्समध्ये आली आहेत. याशिवाय भारतरत्न आणि राज्यसभा खासदार सचिन तेंडुलकर यांचे नावही या यादीत आहे या यादीत इतर लोकांची नावे समाविष्ट आहेत ज्यात बॉलीवूड अभिनेता जॅकी श्रॉफ आणि गांधी कुटुंबातील सदस्य सतीश शर्मा यांची नावे आहेत. याशिवाय नीरा राडियाचे नावही या यादीत आहे.
पेंडोरा पेपर्सच्या तपासानंतर असे समोर आले आहे की श्रीमंतांनी ट्रस्टद्वारे परदेशात त्यांचे आर्थिक व्यवहार लपवले आहेत आणि ते का लपवले गेले याची प्रामुख्याने दोन कारणे समोर येत आहेत. त्यातले प्रमुख कारण म्हणजे आपली खरी ओळख लपवण्यासाठी आणि परदेशात गुंतवणूक करतानाआपले नाव परदेशी संस्थांपासून विशेषत: कंपन्यांपासून) दूर ठेवणे, जेणेकरून कर अधिकाऱ्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचणे अशक्य होईल हे मुख्य कारण आहे आणि दुसरं कारण म्हणजे आपली पूर्ण रोकड , शेअरहोल्डिंग, रिअल इस्टेट, आणि इतर गुंतवणूकीचे लेनदार आणि कायदेशीर संस्थांकडून वाचवणे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.