Pegasus spyware issue, Anil Ambani's phone also hacked Dainik Gomantak
देश

Pegasus: अंबानींचाही फोन हॅक? हेरगिरी प्रकरणात देशातील नवीन नावांचा खुलासा

न्यूज वेबसाइट द वायरने असा अहवाल दिला असून पेगासस(Pegasus) हेरगिरी प्रकरणात(Pegasus Spy Issue) दररोज नवीन काहीतरी खुलासे होताना पाहायला मिळत आहेत

दैनिक गोमन्तक

देशात गाजत असलेल्या पेगासस(Pegasus) हेरगिरी प्रकरणात(Pegasus Spy Issue) दररोज नवीन काहीतरी खुलासे होताना पाहायला मिळत आहेत. देशातील अनेक पत्रकार, विरोधीपक्षातील अनेक नेते, सरकारमधील काही मंत्री त्याचबरोबर देशातील अनेक उद्योगपती या सगळ्यांची हेरगिरी झाली असल्याचे समोर येत आहे आणि आता देशातील प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी(Anil Ambani ) यांच्यासमवेत एडीए ग्रुपच्या वरिष्ठअधिकाऱ्यांचा फोनही हॅक झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. काल गुरुवारीसुद्धा आणखी बऱ्याच नावांची यादी जाहीर करण्यात आली असून त्यात अनिल अंबानी यांचेही नाव आहे. तथापि, अनिल अंबानी सध्या तो फोन नंबर वापरत आहेत की नाही याची पुष्टी झाली नाही. मात्र या अहवालासंदर्भात सध्या एडीएजीकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.

न्यूज वेबसाइट द वायरने असा अहवाल दिला आहे की, अनिल अंबानी आणि रिलायन्स(Reliance) अनिल धीरूभाई अंबानी ग्रुप (एडीएजी) कार्यकारी यांनी वापरलेल्या फोन नंबरचा समावेश पेगासस प्रकल्प गटाच्या मीडिया पार्टनरने केलेल्या लीक यादीमध्ये केला आहे.

या अहवालानुसार 2018 आणि 2019 मध्ये वेगवेगळ्या कालावधीत झालेल्या लीक झालेल्या यादीत भारतातील डाॅसॉल्ट एव्हिएशनचे प्रतिनिधी वेंकट राव पोसिना, साब इंडियाचे माजी प्रमुख इंद्रजित स्याल आणि बोइंग इंडियाचे प्रमुख प्रत्युष कुमार यांचा समावेश आहे. लीक झालेल्या डेटामध्ये फ्रेंच कंपनी एनर्जी ईडीएफचा प्रमुख हरमनजीत नेगी यांचा फोन नंबरही समाविष्ट आहे. या काळात फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या भारत भेटीदरम्यान ते अधिकृत प्रतिनिधी मंडळाचे सदस्य होते.

या पेगासेस प्रकरणी गेल्या रविवारी आंतरराष्ट्रीय मीडियाने स्पष्टीकरण देताना सांगितले होते की, इस्रायलचे हेरगिरी सॉफ्टवेअर, केवळ सरकारी संस्थांना विकले गेले असून हे भारतातील केंद्रीय मंत्री, 40 हून अधिक पत्रकार, तीन विरोधी नेते आणि माजी न्यायाधीश यांची हेरगिरी याच्यामार्फत झाली असल्याचा संशय व्यक्त केला गेला होता तसेच 300 हून अधिक मोबाइल नंबर हे भारतातील बड्या उद्योगपतींचीही नावे असल्याचे स्पष्ट केले झाले होते.

काय आहे पेगसेस सॉफ्टवेअर -

पेगासस सॉफ्टवेअर प्रकल्प आयफोन आणि अँड्रॉइड डिव्हाइस हॅक कारणारे एक सॉफ्टवेअर असून . हे सॉफ्टवेअर वापरकर्त्यांच्या फोन मधील डेटा जसे कि मॅसेजेस , फोटो आणि ईमेल कॅप्चर करण्यास, तसेच त्यांचे कॉल रेकॉर्ड करण्यास आणि मोबाईलमधील मायक्रोफोन सक्रिय करते आणि तो डेटा लीक केला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT