अगदी गरीब कुटुंबातील सदस्यालाही याचा फायदा होऊ शकतो. अशी ही प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) आहे. Dainik Gomantak
देश

दरमहा फक्त 1 रुपया भरा आणि मिळवा 2 लाखांचा कव्हर… अशी करु शकता नोंदणी

शासनाच्या या योजनेत नोंदणी करणे खूप सोपे आहे. यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही बँकेला भेट देऊन अर्ज करू शकता.

दैनिक गोमन्तक

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना: (Pradhan Mantri Suraksha Vima Yojana) आज प्रत्येक व्यक्तीसाठी विमा ही एक अत्यावश्यक गोष्ट बनली आहे. ही केवळ गुंतवणूक नाही तर सामाजिक सुरक्षिततेची हमी आहे. उच्च आणि मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये, लोकांना बऱ्याजदा विमा मिळतो, परंतु गरीब कुटुंबांना विम्याचा हप्ता (Insurance premium to poor families) भरणे खूप कठीण आहे. पण जर तुम्हाला सांगितले गेले की तुम्हाला दरमहा फक्त 1 रुपये प्रीमियम म्हणून भरावे लागतील? अगदी गरीब कुटुंबातील सदस्यालाही याचा फायदा होऊ शकतो. अशी ही प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) आहे.

वास्तविक, गरीब कुटुंबांची सामाजिक सुरक्षा लक्षात घेऊन सरकारने ही योजना आणली होती. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत (PMSBY), 2 लाख रुपयांपर्यंतचे अपघात संरक्षण वार्षिक 12 रुपयांच्या नाममात्र प्रीमियमवर उपलब्ध आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे या प्रीमियममध्ये वर्षातून फक्त एकदाच पैसे भरावे लागतात आणि तेही फक्त एक रुपया. यासाठी तुम्हाला वेगळे प्रयत्न करण्याची गरजही नाही. तुमच्या बँक खात्यातून ते आपोआप कापले जाते.

याची नोंदणी कशी करावी?

शासनाच्या या योजनेत नोंदणी करणे खूप सोपे आहे. यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही बँकेला भेट देऊन अर्ज करू शकता. एवढेच नाही तर तुम्हाला हवे असल्यास तुम्ही बँक मित्राची मदत देखील घेऊ शकता किंवा तुम्ही विमा एजंटशी देखील संपर्कही साधू शकता. सरकारी आणि खाजगी विमा कंपन्या बँकांच्या सहकार्याने ही सेवा देतात.

दरमहा 1 रुपयांच्या खर्चामध्ये 2 लाख रुपयांपर्यंतचा कव्हर

PMSBY चे वार्षिक प्रीमियम फक्त 12 रुपये आहे म्हणजे फक्त 1 रुपये दरमहा. दरवर्षी 31 मे पूर्वी प्रीमियमची रक्कम तुमच्या बँक खात्यातून वजा केली जाईल आणि तुम्हाला 1 जून ते 31 मे या कालावधीसाठी संरक्षण मिळेल. या योजनेअंतर्गत, विमाधारक व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाला किंवा तो पूर्णपणे अपंग झाला तर त्याला 2 लाख रुपयांचा अपघात विमा मिळतो. दुसरीकडे, कायमस्वरूपी आंशिक अपंगत्व असल्यास, 1 लाख रुपयांचे कव्हर देखील उपलब्ध आहे.

या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?

वयाची 70 वर्षे ओलांडल्यावर कव्हर समाप्त होईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेत खाते असणे आवश्यक आहे. तसेच, 31 मे रोजी खात्यात रक्कम असणे देखील आवश्यक आहे. जर प्रीमियम कपाती दरम्यान बँक खाते बंद केल्यास पॉलिसी रद्द होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT