Crowd Stampede Survival Tips

 

Dainik Gomantak

देश

Vaishno Devi Stampede Impact: चेंगराचेंगरीत स्वतःचा बचाव कसा करायचा?

गर्दीच्या ठिकाणी गोंधळ उडाला की, चेंगराचेंगरीची शक्यता असते. अशा परिस्थितीत लोकांना बचाव कसा करावा हे समजत नाही.

दैनिक गोमन्तक

Crowd Stampede Survival Tips: 2022 वर्षाची पहिली (New Year) सकाळ अत्यंत दुःखद बातमी घेऊन आली आहे. जम्मूतील वैष्णोदेवी मंदिरात काल रात्री झालेल्या चेंगराचेंगरीत (Vaishno Devi Stampede) 12 जणांनी आपला जीव गमवावा लागला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत. मदत आणि बचाव कार्य अजूनही सुरू असून काही काळासाठी प्रवासावरही बंदी घालण्यात आली आहे. आता कोरोना प्रोटोकॉल (Covid-19) अंतर्गत इमारत परिसरात अशी चेंगराचेंगरी कशी झाली, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

गर्दीच्या ठिकाणी गोंधळ उडाला की, चेंगराचेंगरीची शक्यता नेहमीच असते. अशा परिस्थितीत लोकांना कसे सामोर जावे लागेल हे समजत नाही. ही आकस्मिक आपत्तीची परिस्थिती आहे, त्यामुळे त्याला सामोरे जाण्यासाठी पुर्वतयारी करणे आवश्यक आहे. चेंगराचेंगरीच्या वेळी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याची माहिती असणे गरजेचे आहे. अमेरिकेतील गर्दी नियंत्रण तज्ज्ञ (Crowd Control Expert) पॉल वर्थेइमर (Paul Wertheimer) यांनी अशा परिस्थितीत जीव वाचवण्यासाठी काही टिप्स दिल्या आहेत ज्या प्रत्येकाने लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

  1. गर्दीत आपली शक्ती वाचवा. गर्दीत विनाकारण धक्काबुक्की करू नका. एखाद्याला ढकलण्यात तुमची शक्ती वाया घालवू नका.

  2. ओरडण्यात किंवा आवाज काढण्यातही आपली शक्ती खर्च करू नका.

  3. नेहमी आपल्या पायावर उभे रहा. पुढे जाण्याच्या प्रयत्नात जमिनीवर पडणे टाळा.

  4. एखाद्या बॉक्सरसारखे आपले हात छातीजवळ ठेवा. यामुळे तुमचा जीव गुदमरणार नाही आणि हालचाल करणे सोपे होईल.

  5. सरळ उभे राहण्याऐवजी, पायात अंतर ठेवून उभे रहा जेणेकरून कुणी मागून ढकलल्यावर संतुलन राखता येईल.

  6. धीर धरा आणि दीर्घ श्वास घेऊन स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT