Railway Station Dainik Gomantak
देश

Bhagalpur Station: रेल्वे स्थानकावरील LED स्क्रिनवर अचानक पॉर्न Video चालू, लोकांनी रेकॉर्डिंग...

Manish Jadhav

Patna Railway Station Video: बिहारची राजधानी पाटणा येथील रेल्वे स्थानकाच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर अश्लील व्हिडीओ दाखवल्यानंतर आता महिनाभरानंतर भागलपूरमधून असेच एक प्रकरण समोर आले आहे.

भागलपूर रेल्वे स्थानकावर लावलेल्या एलईडी स्क्रीनवर अश्लील व्हिडिओ दाखवण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भागलपूर रेल्वे स्थानकाजवळील आंबेडकर चौकात एलईडी डिस्प्ले स्क्रीन असून, त्यावर सोमवारी अश्लील साहित्य दिसले.

लोकांनी फोनवर रेकॉर्ड केले

भागलपूर रेल्वे स्थानकाजवळील एलईडी डिस्प्ले स्क्रीनवर अश्‍लील साहित्य दिसू लागताच मोठ्या संख्येने लोक तिथे जमा झाले. इतकंच नाही तर काही लोकांनी हा मेसेज आपल्या मोबाईलमध्ये कॅमेऱ्यात कैद करुन सोशल मीडियावर (Social Media) टाकला.

मात्र, या प्रकरणाची माहिती मिळताच भागलपूर जिल्हा प्रशासनाने तात्काळ कारवाई करत डिस्प्ले बोर्ड आणि मेसेज हटवला.

डिस्प्ले बोर्ड कंट्रोल रुममधून चालवला जातो.

भागलपूर नगर निगमने शहराच्या सुशोभिकरणाचे कंत्राट जीवन जागृती सोसायटीला दिल्याचे तपासात उघड झाले आहे.

शहरात काही ठिकाणी एलईडी डिस्प्ले बोर्ड लावले आहेत, जेणेकरुन लोकांना वाहतूक नियमांची जाणीव होईल. एलईडी डिस्प्ले बोर्ड कंट्रोल रुममधून चालवला जातो.

काही लोकांनी डिस्प्ले बोर्ड हॅक केला होता

जीवन जागृती सोसायटीचे अध्यक्ष अजय कुमार यांनी दावा केला की, ते काही लोकांनी हॅक केले आहे. त्यामुळे स्क्रीनवर अश्लील मेसेज दिसत होते.

कोतवाली पोलिस स्टेशनचे एसएचओ जवाहर प्रसाद यादव यांनी सांगितले की, जीवन जागृती सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अजय कुमार यांच्या अर्जावरुन आम्ही अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर (FIR) नोंदवला आहे. तो हॅक करण्यात आला आहे. आम्ही प्रकरणाचा तपास करत आहोत. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

पाटणा रेल्वे स्टेशनवर पहिल्यांदा पॉर्न व्हिडिओ चालवण्यात आला

याआधी, 20 मार्च रोजी पाटणा रेल्वे स्थानकावर लावलेल्या एलईडी स्क्रीनवर अश्लील व्हिडिओ चालवण्यात आला होता, त्यानंतर बराच गदारोळ झाला. लोकांनी पाटणा रेल्वे स्थानकावर चाललेला व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करुन तो सोशल मीडियावर शेअर केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji News: मळ्यातील तळ्याचे सुशोभिकरण कधी? पणजीतील स्थानिकांचा सवाल

Panaji Smart City: पणजी मनपा इमारतीला 'ग्रीन सिग्नल' कधी? दोनदा पायाभरणी; मात्र कामाला सुरुवात नाही

Chimbel Flyover: Saint Francis Xavier अवशेष प्रदर्शनापूर्वी एक मार्ग होणार खुला ; चिंबल उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वाकडे

Indian Coast Guards: भारतीय तटरक्षक दलाचा जोरदार सराव! गोवा, महाराष्ट्र किनारपट्टीच्या सुरक्षाव्यवस्थेचे सर्वेक्षण

Hina Khan: तिसऱ्या स्टेजच्या कॅन्सरशी लढणाऱ्या हिनाला गोव्यात वृद्ध महिलेकडून मिळाली प्रेरणा; देवाकडे केली प्रार्थना Video

SCROLL FOR NEXT