The patient suffers at the expense of Post Covid after escaping from the corona crisis
The patient suffers at the expense of Post Covid after escaping from the corona crisis 
देश

कोरोनाच्या संकटातूनन सुटल्यावर पोस्ट कोविडच्या खर्चाने मोडतेय रुग्णांचे कंबरडे

दैनिक गोमंतक

कोरोनाची (Corona) लढाई जिंकतोय, पण पोस्ट कोविडच्या (Post Covid) खर्चाने कंबरडे मोडतय. कोरोनाला हरवल्यानंतर देखील रुग्णांची परवड काही केल्या थांबत नसल्याचे विदारक सत्य समोर येत आहे. कोरोनाचे उपचार घेऊन परतल्यानंतर रुग्णांना पोस्ट कोविडच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या आजारावर अनेक दिवस खर्चिक उपचार रुग्णांना (Patient) करावे लागत आहेत. महत्वाचे म्हणजे कोरोनाचा उपचार सरकारकडून मोफत केल्या जातो परंतू पोस्ट कोविड साठी रुग्णांना स्वतः खर्च करावा लागत आहे. त्यामुळे या उपचारांवर नियंत्रण आणण्याची गरज असल्याची भावना रुग्ण व्यक्त करत आहेत. (The patient suffers at the expense of Post Covid after escaping from the corona crisis)

पोस्ट कोविड मध्ये काही रुग्णांना घरीच रोज काही काळ ऑक्सिजनची गरज भासते. फुफ्फुसांवर व्रण आल्याने त्यासंबंधीचे उपचार घ्यावे लागतात. तसेच तोंडातील इन्फेक्शन (म्युकरमायकोसिस)ज्यात तोंडात बुरशी येते यामुळे रुग्णांचा जीव जाण्याचा देखील धोका अधिक आहे. हे सर्व उपचार अतिशय खर्चिक आहेत. यासाठी अंदाजे ५० हजारांहून अधिकचा खर्च येतो. लॉकडाऊन आणि या आरोग्य आणीबाणीत अनेक नागरिकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यात कोरोनाची बाधा झाली त्यातून सुखरूप बाहेर आलो तरीदेखील आरोग्याची समस्या उभीच आहे. त्याचबरोबर नवे आर्थिक संकट देखील उभे राहत आहे.

महत्वाचे म्हणजे हे उपचार कोणत्याही विमा कंपन्यांकडून मंजूर होत नाही. त्यामुळे विमाधारक देखील संकटात सापडले आहेत. त्यामुळे सरकारने यासंबधी लक्ष घालून योग्य ती पावले उचलण्याची अपेक्षा पोस्ट कोविड ग्रस्त नागरिक व नातेवाईकांकडुन करण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Show Cause Notice: सात दिवसांत स्पष्टीकरण द्या! बेकायदा शुल्क आकारणी प्रकरणी मुष्टिफंड हायस्कूलला नोटीस

Kyrgyzstan Violence: किर्गिस्तानमध्ये विद्यार्थ्यांवर हल्ला; परराष्ट्र मंत्रालयाकडून भारतीय विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन नंबर जारी

Pakistan Road Accident: पाकिस्तानातील पंजाबमध्ये भीषण अपघात; 5 मुलांसह एकाच कुटुंबातील 13 जणांचा जागीच मृत्यू

Taxi Driver Assault: कळंगुट येथे मद्यधुंद पर्यटकांचा स्थानिक टॅक्सीचालकावर हल्ला, पाचजण ताब्यात

Goa Monsoon 2024: आनंदवार्ता! गोव्यात पाच जूनला मॉन्सून हजेरी लावणार

SCROLL FOR NEXT