Mamata Banerjee Dainik Gomantak
देश

Bengal SSC Scam: ममता बॅनर्जींची मोठी कारवाई, पार्थ चॅटर्जींची मंत्रीपदावरून हकालपट्टी

पश्चिम बंगालमधील शाळा भरती घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पार्थ चॅटर्जीला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंत्रीपदावरून हटवले आहे.

दैनिक गोमन्तक

West Bengal SSC Scam: पश्चिम बंगालमधील शाळा भरती घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पार्थ चॅटर्जीला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंत्रीपदावरून हटवले आहे. ईडीच्या अटकेनंतर पार्थ चॅटर्जी यांना मंत्रीपदावरून हटवण्याची मागणी होत होती. दरम्यान, आज ममता बॅनर्जी यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली. या बैठकीनंतर काही वेळातच त्यांना मंत्रिपदावरून हटवण्याचे आदेश जारी करण्यात आले.

दरम्यान, केंद्रीय एजन्सी ईडीने 23 जुलै रोजी त्याला अटक केली होती. एजन्सीने अर्पिता मुखर्जीच्या अटकेपूर्वी तिच्या घरातून सुमारे 21कोटी रुपये जप्त केले होते. पश्चिम बंगालचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या खास आणि अभिनेत्री अर्पिता मुखर्जी यांच्याकडून दोन डायऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत. पार्थ चॅटर्जी यांची काळी गुपिते या डायरीमधून बाहेर पडू शकतात. यातील एका डायरीमध्ये बँकांमध्ये रोख रक्कम जमा केल्याचा तपशील देण्यात आला आहे, तर दुसऱ्या डायरीमध्ये अनेक महत्त्वाच्या व्यक्तींची नावे, रक्कम नोंदवण्यात आली आहे. या डायरीतून काही नवे घोटाळे उघडकीस येतील, अशी आशा ईडीला आहे.

याशिवाय, सरकारी शाळा आणि अनुदानित शाळांमधील कथित शिक्षक भरती घोटाळ्याच्या वेळी पार्थ चॅटर्जी हे शिक्षण विभागाचे प्रभारी होते. नंतर हा विभाग त्यांच्याकडून घेतला गेला. शालेय सेवा आयोगाकडून शिक्षक भरतीमध्ये कथित अनियमिततेच्या आरोपांची अंमलबजावणी संचालनालय चौकशी करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT