Parliamentary panel disappointed by the IT Ministry answers on PM Narendra Modi twitter hack case

 

Dainik Gomantak

देश

पंतप्रधानांच्या ट्विटर अकाऊंट हॅक प्रकरणी संसदीय समितीची चौकशी मात्र...

12 डिसेंबर रोजी पहाटे 2.11 वाजता पंतप्रधानांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्विट पोस्ट करण्यात आले होते

दैनिक गोमन्तक

काँग्रेस नेते शशी थरूर (Shashi Tharoor) यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय स्थायी समितीने सोमवारी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (IT Ministry) उच्च अधिकाऱ्यांकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे ट्विटर (Twitter) हँडल आणि पेगासस हॅक प्रकरणाची चौकशी केली.समितीच्या सदस्यांनी पंतप्रधानांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याबद्दल विचारले असता, अधिकाऱ्यांकडे या प्रश्नाचे कोणतेही उत्तर नव्हते आणि त्यांनी त्याच गोष्टी सांगितल्या ज्या आधीच जगजाहीर आहेत. समितीच्या सूत्रांनी एएनआयला सांगितले की, समितीच्या अधिकाऱ्यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयकडे चौकशी केली. त्यांना पंतप्रधानांचे ट्विटर अकाउंट हॅक करण्यामागचे कारण विचारण्यात आले.मात्र अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची अधीक चौकशी सुरू असल्याचं सांगितलं आहे. (Parliamentary panel disappointed by the IT Ministry answers on PM Narendra Modi twitter hack case)

त्याचबरोबर अधिकारी डिजिटल स्पेसमध्ये महिलांची सुरक्षा, इंटरनेट किंवा ऑनलाइन न्यूज मीडिया प्लॅटफॉर्मचा गैरवापर रोखण्यासह नागरी हक्कांच्या संरक्षणाच्या मुद्द्यावर देखील समितीसमोर हजर झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, थरूर यांनी कारवाईदरम्यान पेगाससच्या वापराबाबत देखील प्रश्न उपस्थित केला होता, ज्यावर अधिकाऱ्यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगितले. थरूर यांनी या प्रकरणी त्यांचे सहकार्य मागितले असता अधिकार्‍यांनी त्यांना या प्रकरणी काहीही बोलायचे नसल्याचे सांगत उत्तर देण्यास नकार दिला.

दरम्यान रविवार, 12 डिसेंबर रोजी पहाटे 2.11 वाजता पंतप्रधानांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्विट पोस्ट करण्यात आले होते. या ट्विटमध्ये , 'भारताने बिटकॉइनला अधिकृतपणे कायदेशीर मान्यता दिली आहे. सरकारने अधिकृतपणे 500 बिटकॉइन्स खरेदी केले आहेत आणि ते देशातील सर्व नागरिकांमध्ये वितरित केले जात आहेत. त्वरा करा...... भविष्य आज आले आहे!' असे लिहिण्यात आले होते.

पंतप्रधानांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याच्या बातमीने सोशल मीडियावरील युजर्समध्ये खळबळ उडाली होती . जेव्हा पंतप्रधानांचे खाते सुरक्षित नसते तेव्हा सामान्य माणसाचे काय होऊ शकते असा प्रश्न सर्वांना पडला होता. 2020 च्या सप्टेंबरमध्ये पंतप्रधानांच्या वेबसाइट narendramodi.in च्या ट्विटर खात्यावरही असेच घडले आणि त्याच्या अनुयायांना मदत निधीमध्ये 'क्रिप्टोकरन्सी' दान करण्यास सांगितले गेले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI 2025 चा दिमाखदार समारोप! रजनीकांत, रणवीरच्या उपस्थितीने लावले चार चांद, ‘स्किन ऑफ युथ’ला गोल्डन पिकॉक तर संतोष दवखर यांना 'गोंधळ'साठी 'रौप्य मयूर'

Goa Firing: सत्तरीतील पडोसे गावात पुन्हा गोळीबार! एकाला अटक, एअरगन आणि काडतुसे जप्त; वाळपई पोलिसांकडून पुढील तपास सुरु

PM Modi Goa Speech: "आयुष्याच्या प्रत्येक वळणावर गोव्याच्या भूमीने मला दिशा दिली", PM मोदी असं का म्हणाले? Watch Video

Goa Accident: मुळगावात दुचाकींची समोरासमोर धडक, दोन तरुणांचा मृत्यू; अपघाताची पोलिसांकडून चौकशी सुरु

''गोव्याने केवळ संस्कृतीच जपली नाहीतर...'', गोकर्ण पर्तगाळी मठाच्या योगदानाचे कौतुक करताना PM मोदींनी काढले गौरोद्गार VIDEO

SCROLL FOR NEXT