Parliament Security Breach|Smoke Candle Dainik Gomantak
देश

संसदेतील सुरक्षा भंग केल्याप्रकरणी कर्नाटकातील अभियंता ताब्यात, वडील आहेत निवृत्त एसपी

बुधवारी रात्री त्याला बागलकोट येथील घरातून ताब्यात घेतले असून, त्याला राजधानी दिल्लीत आणले जात आहे.

Pramod Yadav

Parliament Security Breach: संसदेतील सुरक्षा भंग केल्याप्रकरणी कर्नाटकातील एका अभियंत्याला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेला अभियंता निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे.

बुधवारी रात्री त्याला बागलकोट येथील घरातून ताब्यात घेतले असून, त्याला राजधानी दिल्लीत आणले जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साईकृष्ण जगाली हा संसदेतील सुरक्षा भंग करुन धूर सोडणाऱ्या दोन घुसखोरांपैकी एक असून, मनोरंजन डी याचा मित्र आहे.

या प्रकरणात चार आरोपींपैकी मनोरंजन हा देखील एक आरोपी आहे. सर्व आरोपींवर दहशतवादविरोधी कायदा, युएपीए कायद्याअंतर्गत आरोपांचा सामना करावा लागत आहे.

साईकृष्ण आणि मनोरंजन बेंगळुरूच्या एका अभियांत्रिकी महाविद्यालयात एकत्र शिक्षण घेत होते. संसदेतील एका घुसखोराने चौकशीदरम्यान साईकृष्णाचे नाव घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

संशयित आरोपी साईकृष्ण हा निवृत्त पोलीस उपअधीक्षकाचा मुलगा आहे. तो बागलकोट येथील त्याच्या घरातून काम करत होता. दरम्यान, साईकृष्ण याची बहीण स्पंदाने तो निर्दोष असल्याचे स्पष्टीकरण प्रसार माध्यमांना दिले आहे.

"दिल्ली पोलीस घरी आले होते हे खरे आहे. पोलिसांनी माझ्या भावाची चौकशी केली. आम्ही या चौकशीत संपूर्ण सहकार्य केले. साईकृष्णाने काहीही चुकीचे केलेले नाही. तो आणि मनोरंजन रूममेट होते. आता माझा भाऊ घरून काम करतो," असे स्पंदा म्हणाली.

गेल्या बुधवारी संसदेत सुरक्षा भंग केल्याप्रकरणी एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे. मणिपूरमधील अशांतता, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधणे हा त्यांचा उद्देश असल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले.

या प्रकरणात आत्तापर्यंत लोकसभेत घुसखोरी करणारे मनोरंजन आणि सागर शर्मा, संसदेबाहेर धुराच्या कांड्या वापरणारे अमोल शिंदे आणि नीलम आझाद तसेच, सुरक्षा भंग प्रकरणाचा मास्टरमाईंड मानला जाणारा ललित झा आणि झा यांना कथितपणे मदत करणारा महेश कुमावत यांना अटक करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mungul Crime: मुंगुलप्रकरणी नवी अपडेट! हल्ल्यानंतर गँगस्टर वेलीने घेतली 60 लाखांची कार; काणकोणमधील एकजण पोलिसांच्या रडारवर

Goa Politics: 'भाजपला पराभूत करण्‍यासाठी गोवा फॉरवर्ड आणि आरजीपीला सोबत घेऊन लढू', पाटकरांनी केले युतीचे सूतोवाच

Candolim: मद्यधुंद पर्यटकांचा गोव्यात धुडगूस! कांदोळी बीचवर 10 दुचाक्यांची तोडफोड; बंगळुरूच्या 5 जणांना घेतले ताब्यात

Goa Road Repair: '..येत्‍या 15 दिवसांत रस्‍ते सुधारू'! CM सावंतांचे आश्‍‍वासन; खड्डेमय रस्‍त्‍यांवरून ‘आप’ आक्रमक

Horoscope:नोकरीत सांभाळा,आरोग्याचा विचार करा, प्रेमसंबंधात गोडवा वाढेल; वाचा तुमची रास काय सांगते?

SCROLL FOR NEXT