Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Viral Video Train Window Negligence: व्हिडिओमध्ये रेल्वे ट्रेनमधील एका सीटवर बसलेल्या पालकांनी केलेला अक्षम्य आणि अत्यंत धोकादायक निष्काळजीपणा उघडकीस आला.

Manish Jadhav

Viral Video Train Window Negligence: आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोन आणि सोशल मीडियाचा वापर सामान्य झाला आहे. प्रवास करताना असो किंवा बाजारात, काहीही विचित्र, धक्कादायक किंवा कौतुकास्पद घडताना दिसले की लोक लगेचच आपल्या मोबाईलमध्ये ते शूट करुन सोशल मीडियावर अपलोड करतात. यातील अनेक व्हिडिओ इंटरनेटवर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होतात आणि लोकांचे लक्ष वेधून घेतात. असाच एक काळजाचा ठोका चुकवणारा आणि भारतीय रेल्वेतील निष्काळजीपणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्यावर नेटिझन्स अत्यंत संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ एका रेल्वे स्टेशनवरील आहे. व्हिडिओमध्ये ट्रेनमधील एका सीटवर बसलेल्या पालकांनी केलेला अक्षम्य आणि अत्यंत धोकादायक निष्काळजीपणा उघडकीस आला. सामान्यतः कोणत्याही वाहनातून प्रवास करताना खिडकीतून हात किंवा डोके बाहेर न काढण्याच्या सूचना वारंवार दिल्या जातात. परंतु, या व्हिडिओमध्ये पालकांनी आपल्या एका चिमुकल्या मुलीला थेट चालत्या ट्रेनच्या खिडकीमध्ये बसवून ठेवल्याचे दिसत आहे. त्या लहान मुलीचे दोन्ही पाय खिडकीच्या बाहेर लटकत असून तिचा एक हातही बाहेर आला आहे.

हा धक्कादायक व्हिडिओ 'एक्स'वर @guneshgodara या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला. हा व्हिडिओ पोस्ट करताना युजरने 'यापेक्षा मोठा निष्काळजीपणा दुसरा असूच शकत नाही' असे उद्विग्न कॅप्शन दिले. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्सचा राग अनावर झाला असून त्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला. दररोज रेल्वेचे अपघात पाहू आणि ऐकूनही लोक कसा धडा घेत नाहीत, असा प्रश्न एका युजरने उपस्थित केला. तर काहींनी अशा बेजबाबदार पालकांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. प्रवाशांच्या सुरक्षेशी खेळणारा आणि अत्यंत धोकादायक ठरु शकणारा हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर (Internet) चर्चेचा विषय बनला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT