Supreme Court Dainik Gomantak
देश

'तुम्ही कुठे आहात ते आधी सांगा, मगच सुनावणी होईल'

न्यायालयाने म्हटले की, परमबीर सिंग (Parambir Singh) यांना सध्या संरक्षण मिळू शकत नाही, आधी ते कुठे आहेत ते सांगावे लागेल.

दैनिक गोमन्तक

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) गुरुवारी सुनावणी झाली. सिंग यांनी संरक्षणासाठी याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायालयाने म्हटले की, परमबीर सिंग यांना सध्या संरक्षण मिळू शकत नाही, आधी ते कुठे आहेत ते सांगावे लागेल. न्यायालयाने त्यांना 22 नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली असून, पुढील सुनावणीच्या वेळी परमबीर सिंग यांना त्यांचा ठावठिकाणा सांगावा लागेल.

दरम्यान, सिंग यांच्या सुरक्षेबाबतच्या याचिकेवर ते देशात आहेत की, बाहेर हे सांगल्यानंतरच त्यावर सुनावणी होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने सिंह यांच्या वकिलाला 22 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीत याची माहिती देण्यास सांगितले आहे. सिंग यांच्या वतीने संरक्षण मिळावे, अशी याचिका पॉवर ऑफ अॅटर्नीद्वारे दाखल करण्यात आली आहे.

न्यायालयाने म्हटले, 'एकीकडे तुम्ही सुरक्षा मागत आहात, तर तुम्ही कुठे आहात हे कोणालाच माहिती नाही. समजा तुम्ही परदेशात बसून पॉवर ऑफ अॅटर्नीद्वारे कायदेशीर मार्ग स्वीकारलात तर काय होईल. जर तसे असेल आणि कोर्टाने तुमच्या बाजूने निर्णय द्यावा असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला भारतात यावे लागेल. जोपर्यंत तुम्ही कुठे आहात हे न्यायालयाला सांगितले जाणार नाही, तोपर्यंत तुमच्या याचिकेवर सुनावणी होणार नाही,' असे न्यायालयाने सांगितले. या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या खंडपीठात न्यायमूर्ती एमएम सुंदरेश (Justice MM Sundaresh) यांचाही समावेश होता. मुंबईतील न्यायदंडाधिकारी न्यायालयाने सिंग आणि शहरातील काही पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात फरार घोषित केले आहे. सिंग यांनी या वर्षी मे महिन्यात त्यांच्या कार्यालयाला शेवटची भेट दिली होती त्यानंतर ते रजेवर गेले होते. राज्य पोलिसांनी गेल्या महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले होते की ते कोठे आहेत याची कोणतीही माहिती नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Birsa Munda Jayanti: बिरसा मुंडा जयंतीला लोटला जनसागर! मडगावात भव्य मोटारसायकल रॅली; काणकोण येथे सांस्कृतिक सादरीकरणे

Goa Panchayat: गोव्यातील पंचायतींसाठी नवी माहिती! महिन्यातून होणार 4 बैठका; खात्‍याकडून मसुदा अधिसूचना जारी

IFFI 2025 Opening: ब्राझिलियन चित्रपट ‘द ब्लू ट्रेल’ने उघडणार इफ्फीचा पडदा! काय असणार रूपरेषा; गोव्यातला फिल्म्स कोणत्या? पहा Video

Pooja Naik News: पूजा नाईकची होणार 'नार्को टेस्ट'? पोलिसांची तयारी; सरकारच्या मान्यतेनंतर 'त्या' दोघांवर होणार FIR दाखल

Horoscope: आर्थिक क्षेत्रात फायदा, नवीन संधी समोर येणार, सकारात्मक राहा; 'या' राशीसाठी आजचा दिवस सोन्याचा

SCROLL FOR NEXT