Union Budget 2023: Dainik Gomantak
देश

Budget 2023: पेपरलेस बजेट, वही खाते, सर्वात मोठे भाषण... प्रत्येक बजेटवेळी सीतारामन यांनी जपले वेगळेपण

यंदा काय असणार खास? शेअर मार्केट ओपन होताच 400 अंकानी वाढला

Akshay Nirmale

Union Budget 2023: अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांचा हा पाचवा अर्थसंकल्प असणार आहे. यापुर्वी त्यांनी चार वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे.

विशेष म्हणजे, प्रत्येक अर्थसंकल्पावेळी सीतारामन यांनी काही ना काही वेगळेपण जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्या यंदा काय नवीन करणार अशी चर्चा आहे.

अर्थ मंत्री सीतारामन यांनी गेल्या 4 बजेटमध्ये काही ना काही वेगळेपण जपले आहे. यात ब्रीफकेस ते वही खाते असा बदल असेल किंवा बजेटचे सर्वाधिक लांबीचे भाषण असेल. सन 2020 च्या बजेटवेळी सीतारामन यांनी तब्बल 2 तास 41 मिनिटांचे भाषण केले होते.

हे बजेटचे सर्वाधिक लांबीचे भाषण आहे. यावेळी अनेक खासदार कंटाळले होते. या वेळी अडीच तास भाषण केल्यानंतर सीतारामन यांचीही तब्येत बिघडली होती. तेव्हा हरसिमरत कौर त्यांच्याजवळ आल्या. सीतारामन यांनी बाटलीतून औषधही पिले. त्यावेळी शेजारी बसलेले राजथान सिंह यांनी सीतारामन यांना आता वाचू नका, असे सांगितले.

पण तरीही त्यांनी वाचन सुरूच ठेवले. अखेर सीतारामन यांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर शेवटची दोन पाने न वाचताच त्या बसल्या.

त्यापुर्वी 2019 मध्ये बजेट सादर करताना सीतारामन यांच्या हातात नेहमीप्रमाणे सुटकेस नव्हती. तर वही खाते होते. लाल कपड्यातील वही खाते बजेट घेऊन जाताना सीतारामन दिसताच ती ब्रेकिंग न्यूज ठरली होती.

दरम्यान, गतवर्षी 2022 मध्ये निर्मला सीतारामन या टॅबलेटवर बजेट वाचून दाखवताना दिसल्या होत्या. त्यांनी 1 तास 20 मिनटे टॅबमध्ये पाहून भाषण केले, मात्र GST ची आकडेवारी सांगण्यासाठी त्यांना कागद हाती घ्यावाच लागला होता.

या सर्व गोष्टींमुळेच यंदाही सीतारामन काय नवीन करणार याची उत्सुकता आहे. कारण यंदाचे बजेट महत्वाचे असणार आहे. या वर्षी देशातील 9 राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. तर पुढील वर्षी लोकसभा निवडणूक आहे. त्यामुळे पुढील वर्षाचा अर्थसंकल्प हा पुर्ण नसेल. त्यामुळे त्याआधीचा हा यंदाचा अर्थसंकल्प पुर्ण अर्थसंकल्प असणार आहे.

दरम्यान, बुधवारी सकाळी 8:30 अर्थ मंत्री सीतारामन अर्थ मंत्रालयात आल्या. त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांसह राष्ट्रपती भवन गाठले. तिथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून बजेटसाठी मंजुरी घेतली.

आता या बजेटवर मंत्रीमंडळात शिक्कामोर्तब होईल. आज सकाळी ९ वाजता सीतारामन यांनी अर्थसंकल्पाच्या दस्तऐवजासह प्रसारमाध्यमांसमोर पोज दिली. हा अर्थसंकल्प सीतारामन यांचा अर्थमंत्री म्हणून पाचवा अर्थसंकल्प असून देशाचा 75 वा अर्थसंकल्प असणार आहे. दरम्यान, अर्थराज्य मंत्री भागवत कराड यांनी सकाळी मंदिरात पुजा केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT