Punjab Firing: Dainik Gomantak
देश

Bathinda Military Station Firing: भटिंडा मिलिटरी स्टेनशच्या मेसमध्ये गोळीबार; चार जवान शहिद

संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे.

Puja Bonkile

Four Killed in Firing incident at Bathinda Military Station: पंजाबमधील भटिंडा मिलिटरी स्टेशनवर गोळीबार झाला आहे. या घटनेत चार जवान शहीद झाले आहेत. ही घटना सकाळी 4.35 घडली आहे.

गोळीबाराचे कारण अद्याप शोधले जात आहे. त्याचबरोबर शोध मोहीमही सुरू आहे. संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे.

दुसरीकडे, भटिंडाचे एसएसपी जीएस खुराना यांनी एनडीटीव्हीला सांगितले की, हा दहशतवादी हल्ला नाही. आत काहीतरी प्रकरण आहे.

आमची टीम बाहेर वाट पाहत आहे. सध्या लष्कराने आम्हाला आत जाण्याची परवानगी दिलेली नाही.

भटिंडा मिलिटरी स्टेशन शहराला लागून आहे. हे एक जुनं आणि खूप मोठं मिलिटरी स्टेशन आहे.

पूर्वी ते शहरापासून थोडं लांब होतं, परंतु शहराच्या विस्तारामुळं आता मिलिटरी स्टेशन रहिवासी भागाच्या जवळ आलं आहे. या मिलिटरी स्टेशनच्या बाहेर कोणत्याही सामान्य वाहनानं जाता येतं.

आर्मी कॅंट भटिंडा जिओ मेसमध्ये गोळीबार झाल्याची माहिती पंजाब पोलिसांच्या सूत्रांकडून मिळाली आहे. आर्मी कॅन्टचे सर्व प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहेत.

सुमारे 2 दिवसांपूर्वी इंसास रायफलसह 28 काडतुसेही गायब झाली होती. या घटनेमागे लष्कराचे काही जवान असू शकतात. सध्या लष्कराने स्थानिक पोलिसांना कॅन्टोन्मेंट परिसरात जाण्यास मनाई केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

SCROLL FOR NEXT