Palestinian flags hoisted in Pakistan-Bangladesh match, 4 arrested by police. Dainik Gomantak
देश

ODI World Cup 2023: पाकिस्तान-बांगलादेश सामन्यावेळी मैदानात फडकवले पॅलेस्टिनी झेंडे, 4 जण पोलिसांच्या ताब्यात

Palestinian Flag: पीटीआय या वृत्तसंस्थेने स्थानिक पोलिसांचा हवाला देत या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेतल्याचे वृत्त दिले आहे. हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलने गाझा पट्टीवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही घटना समोर आली आहे.

Ashutosh Masgaunde

Palestinian flags hoisted in Pakistan-Bangladesh match, 4 arrested by police: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये, पाकिस्तानने मंगळवारी ईडन गार्डन्सवर बांगलादेशचा सात विकेट्सने पराभव केला. यासह पाकिस्तानने स्पर्धेतील आपले आव्हान जीवंत ठेवले.

कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर झालेल्या या सामन्यादरम्यान एक व्यक्ती पॅलेस्टाईनचा झेंडा फडकावत 'फ्री पॅलेस्टाईन' मोहिमेला सुरुवात करताना दिसला.

त्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो डायसवर चढून पॅलेस्टाईनचा झेंडा फडकावताना दिसत आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेने स्थानिक पोलिसांचा हवाला देत या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेतल्याचे वृत्त दिले आहे. हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलने गाझा पट्टीवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही घटना समोर आली आहे.

बांगलादेश आणि कोलकाता यांच्यातील अंतर कमी असल्याने हजारो बांगलादेशी प्रेक्षक ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर त्यांच्या संघाला पाठींबा देण्यासाठी कोलकाता येथे पोहोचले होते.

मात्र, ताब्यात घेण्यात आलेले लोक स्थानिक आहेत की, बांगलादेशातून आले आहेत हे अद्याप समजू शकलेले नाही.

पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यात 67,000 प्रेक्षकांची क्षमता असलेल्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर 27,000 पेक्षा जास्त प्रेक्षकांची उपस्थिती होती.

शाकिब अल हसनच्या नेतृत्वाखाली बांगलादेशने कोलकात्यात नेदरलँड आणि पाकिस्तानविरुद्ध दोन सामने खेळले, पण दोन्ही वेळा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. बांगलादेशचा संघ आता विश्वचषकातून बाहेर पडला आहे.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, शाहीन शाह आफ्रिदीच्या शानदार गोलंदाजीनंतर सलामीवीर फखर जमानने शानदार अर्धशतकी खेळी करत पुनरागमन केले, ज्यामुळे पाकिस्तानने बांगलादेशचा सात गडी राखून पराभव केला आणि विश्वचषक 2023 मधून त्यांना बाहेर काढले आणि आपले आव्हान जीवंत ठेवले.

शाहीनच्या तीन बळी आणि वेगवान गोलंदाजांच्या दमकार कामगिरीमुळे पाकिस्तानने बांगलादेशला 45.1 षटकात केवळ 204 धावांत गुंडाळले.

त्यानंतर सलामीवीर फकर जमानच्या ७४ चेंडूंत सात षटकार आणि तीन चौकारांसह ८१ धावा आणि अब्दुल्ला शफीकच्या ६९ चेंडूंत नऊ चौकार, दोन षटकारांसह ६८ धावांच्या अर्धशतकी खेळीमुळे पाकिस्तानने ३२.३ षटकांत तीन गडी गमावून २०५ धावा करून विजय मिळवला.

यंदाच्या विश्वचषकातील पाकिस्तानचा सात सामन्यांमधला हा तिसरा विजय असून चार सामने गमावल्यानंतर त्यांना पुन्हा विजय मिळवता आला. त्यामुळे त्यांची उपांत्य फेरीची थोडीशी आशा जिवंत राहिली आहे.

आता त्यांचा सामना 4 नोव्हेंबरला न्यूझीलंडशी होणार असून 11 नोव्हेंबरला इंग्लंडविरुद्धच्या सामन्याने संघाच्या साखळी फेरीतील मोहिमेचा शेवट होणार आहे.

बांगलादेशला अशा प्रकारे सलग सहाव्या पराभवाला सामोरे जावे लागले, दोन सामने शिल्लक असतानाही बांगलादेश विश्वचषक स्पर्धेतून अधिकृतपणे बाहेर पडणारा पहिला संघ बनला. आता शेवटच्या दोन सामन्यात बांगलादेशचा सामना श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Morjim Beach: 'मोरजी किनाऱ्यावरील सुशोभीकरण थांबवा'! गोवा खंडपीठाचा आदेश; GTDC प्रकल्पाला खीळ

Career and Money Horoscope: करिअरमध्ये यश, पैशांत वाढ! वाचा दैनिक भविष्य; जाणून घ्या ग्रहांचे संकेत

Cutbona Jetty: 'माशे मेंळ्ळे ना'! समुद्र अजून खवळलेला, कुटबण जेटीवर मजूर परतले; ट्रॉलरमालकांची वाढली लगबग

Goa Assembly Live: "हम किसीसे काम नहीं" दाखवण्याचा प्रयत्न: आमदार विजय सरदेसाई

Illegal Liquor Goa: सासष्‍टीत सर्वाधिक बेकायदा दारू धंदा! 5 वर्षांत 1395 प्रकरणे नोंद; नव्‍याने 2365 परवाने

SCROLL FOR NEXT