Greater Noida: ग्रेटर नोएडामध्ये बेकायदेशीरपणे राहणारी पाकिस्तानी महिला आणि तिच्या चार मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. PUBG खेळताना ही महिला भारतीय तरुणाच्या प्रेमात पडली होती. प्रियकराला भेटण्यासाठी ती चार मुलांसह नेपाळमार्गे भारतात आली होती. मात्र आता, महिलेला लपवून ठेवणाऱ्या तिच्या प्रियकरालाही पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान, प्रियकराने महिलेला (Women) ग्रेटर नोएडा येथे भाड्याच्या घरात ठेवले होते. ग्रेटर नोएडाचे डीसीपी साद मिया खान यांनी सांगितले की, "पाकिस्तानी महिला आणि स्थानिक तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. महिलेची चार मुलेही पोलिसांच्या ताब्यात आहेत.''
दुसरीकडे, PUBG गेम खेळत असताना 30 वर्षीय पाकिस्तानी महिला एका भारतीय तरुणाच्या संपर्कात आली. पोलिस (Police) अधिकाऱ्याने सांगितले की, गेम खेळत असताना दोघांमध्ये जवळीकता निर्माण झाली होती. खान म्हणाले की, 'महिला आणि तिच्या प्रियकराची चौकशी केली जात आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर अधिक माहिती शेअर केली येईल.''
एका स्थानिक पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ही महिला गेल्या महिन्यात नेपाळमार्गे भारतात आली होती. त्यानंतर बसने तिने उत्तर प्रदेशातील नोएडा गाठले. महिला आणि तिची मुले आरोपी तरुणासोबत ग्रेटर नोएडातील रबुपुरा येथे भाड्याच्या घरात राहत होते.
ग्रेटर नोएडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमा हैदरने चारही मुलांना सोबत आणले आहे. कारण तिला माहीत होतं की, पाकिस्तानातलं आपलं घर सोडून ती भारतात गेली तर तिथं (पाकिस्तान) तिच्या मुलांची काळजी कोणी घेणार नाही. तिने ओळख लपवण्यासाठी सलवार सूट आणि साडी देखील परिधान केली. प्रियकर सचिनने तिला आपली पत्नी म्हणून भाड्याच्या घरात ठेवले होते. सीमा हैदर ही मूळची पाकिस्तानी आहे. तिथून छुप्या पद्धतीने भारतात पळून आली आहे, याबद्दल तिथल्या आणि आसपासच्या कोणालाही कानोकान खबर नसेल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.