Pakistani ISI Agent Satyendra Siwal Arrest  Dainik Gomantak
देश

Pakistani ISI Agent Arrest: कोण आहे ISI एजंट सत्येंद्र सिवाल? मेरठमधून गजाआड; 4 वर्षे करत होता भारताची हेरगिरी

Pakistani ISI Agent Satyendra Siwal Arrest: उत्तर प्रदेश पोलिसांनी पाकिस्तानी आयएसआय एजंटला मेरठमधून अटक केली आहे. सत्येंद्र सिवाल (Satyendra Siwal) असे या एजंटचे नाव आहे.

Manish Jadhav

Pakistani ISI Agent Arrest: उत्तर प्रदेश पोलिसांनी पाकिस्तानी आयएसआय एजंटला मेरठमधून अटक केली आहे. सत्येंद्र सिवाल (Satyendra Siwal) असे या एजंटचे नाव आहे. सत्येंद्र चार वर्षांपासून रशियाची राजधानी मॉस्को येथील भारतीय दूतावासात काम करत होता. सध्या तो मेरठमध्ये लपून बसला होता.

गुप्त माहितीच्या आधारे उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने (UP ATS) त्याला अटक केली. सध्या पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत आणि पुढील तपास करत आहेत. आतापर्यंतच्या तपासात सत्येंद्र सिवाल हा हापूरचा रहिवासी असल्याचे समोर आले आहे. त्याच्याकडून दोन मोबाईल फोन आणि आधार कार्ड जप्त करण्यात आले आहे.

त्याचा फोन सर्व्हिलान्सवर होता

मिळालेल्या माहितीनुसार, सत्येंद्र हापूरच्या शाहमहिउद्दीनपूर गावचा रहिवासी आहे. येथे राहून तो आयएसआयच्या संपर्कात होता. जेव्हा यूपी एटीएसला याची माहिती मिळाली तेव्हा त्याचा फोन सर्व्हिलान्सवर होता. त्याच्या हालचालींवर बराच वेळ नजर ठेवण्यात आली होती. खात्री केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. सुरुवातीला तो चौकशीत सहकार्य करत नव्हता. पण पोलीसी खाक्या दाखवल्यानंतर तो पटापटा बोलू लागला. त्याने आपला गुन्हा कबूल केला. भारतात राहत असताना तो पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या संपर्कात आला होता.

गुप्त माहिती लीक झाली आहे

यूपी एटीएसच्या म्हणण्यानुसार, तो 2021 पासून रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये काम करत आहे. तो मॉस्को येथील भारतीय दूतावासात इंडिया बेस्ट सिक्युरिटी असिस्टंट म्हणून काम करत आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने आतापर्यंत संरक्षण मंत्रालय आणि केंद्र सरकारशी संबंधित अनेक माहिती पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयला दिली आहे. आता पोलीस सत्येंद्रची चौकशी करत असून त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांची यादी तयार करत आहेत. त्याने आतापर्यंत कोणत्या स्तरावर आणि कोणती माहिती लीक केली आहे, याचाही शोध घेतला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL Auction 2025: मास्टर ब्लास्टरच्या लेकाला मिळाला खरेदीदार! शेवटच्या क्षणी MI ने खेळला मोठा डाव

Mumbai - Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाबाबत मोठी अपडेट, मुख्य बोगदा १५ दिवस राहणार बंद

Bhopal Goa Flight: भोपाळ ते गोवा थेट विमानसेवा! पहिल्यांदाच 180 आसनी क्षमतेचे बोईंग प्रवाशांच्या सेवेत

IPL Auction: 13 वर्षीय वैभव सूर्यवंशीवर पडला पैशांचा पाऊस, RR च्या ताफ्यात सामील; संजूच्या नेतृत्वाखाली करणार गर्दा!

धक्कादायक! 'गोवा सोड अन्यथा..', धमकी देत मारहाण करणाऱ्या 'मगो'च्या नेत्याला अटक

SCROLL FOR NEXT