Pakistan will not attend NSA meetings by India on Afghanistan crisis  Dainik Gomantak
देश

भारतात होणाऱ्या NSA च्या बैठकीत पाकिस्तान राहणार गैरहजर

या प्रादेशिक परिषदेसाठी भारताने रशिया, इराण, चीन, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तानच्या NSA लाही आमंत्रित केले आहे.

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानातील (Afghanistan) सध्याच्या परिस्थितीवर 10 नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीत (New Delhi)होणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) स्तरावरील परिषदेत सहभागी न होण्याचा निर्णय पाकिस्तानने (Pakistan) घेतला असल्याची माहिती मिळत आहे. दहशतवाद्यांचे आश्रयस्थान असलेल्या पाकिस्तानला आपल्या शेजारी देश अफगाणिस्तानात भारताला शांतता प्रस्थापित करणारा देश या भूमिकेत पाहायचे नाही. 10 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या महत्वपूर्ण परिषदेचे आयोजन भारतीय NSA अजित डोवाल करत आहेत.(Pakistan will not attend NSA meetings by India on Afghanistan crisis)

पाकिस्तानातील एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार पाकिस्तानी NSA मोईद युसूफ यांनी पत्रकारांना सांगितले की, 'भारत युद्धग्रस्त अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापिताची भूमिका बजावू शकत नाही'. युसूफ म्हणाले, 'पाश्चात्य देशांप्रमाणे आम्ही अफगाणिस्तानपासून अलिप्त राहू शकत नाही. आमच्याकडे तो पर्याय नाही.अफगाणिस्तानशी आमचे संबंध केवळ राजकीयच नाहीत तर मानवतावादी आणि राष्ट्रीय सुरक्षेचेही आहेत.' पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने यापूर्वी भारताकडून शिखर परिषदेच्या निमंत्रणाची पुष्टी केली होती. परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी म्हणाले की, दोन्ही देशांमधील विद्यमान संबंधांच्या अनुषंगाने या प्रकरणी निर्णय घेतला जाईल.पण आता मात्र पाकिस्तान या परिषदेत सहभागी होणार नसल्याचे काळात आहे.

या प्रादेशिक परिषदेसाठी भारताने रशिया, इराण, चीन, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तानच्या NSA लाही आमंत्रित केले आहे. 2016 मध्ये पठाणकोट येथील लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध अधिकच ताणले गेले आहेत.यापूर्वीही अश्रफ घनी सरकारच्या सहभागाने एप्रिलमध्ये अशीच एक बैठक आयोजित करण्याची योजना भारताने आखली होती. मात्र, भारतातील कोरोनाची दुसरी लाट आणि त्यावेळी अफगाणिस्तानमधील झपाट्याने बिघडलेल्या परिस्थितीमुळे ती रद्द करण्यात आली होती.

भारताने अलीकडेच मॉस्को स्वरूपाच्या बैठकीत भाग घेतला होता ज्यामध्ये तालिबानचे वरिष्ठ नेतेही सहभागी झाले होते. मॉस्कोमध्ये झालेल्या बैठकीत भारतीय अधिकाऱ्यांनी तालिबान नेत्यांशीही चर्चा केली होती. विशेष म्हणजे तालिबान सत्तेत आल्यानंतर अफगाणिस्तानातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. तालिबान महिला आणि शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी रोज नवे कायदे आणत आहे. राजधानी काबूलसह अनेक प्रांतांमध्ये बॉम्बस्फोटांच्या घटनाही पूर्वीपेक्षा अधिक वाढल्या आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेची हानी होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT