Pakistan planning to attack on India with the help of terrorist organization ISI

 

Dainik Gomantak

देश

पाकिस्तान रचतोय भारताविरुध्द नापाक कट, नवीन दहशतवादी संघटनांची स्थापना

मागील काही दिवसात भारतीय सैन्यापुढे आत्मसमर्पण केलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्याशी संबंधित अनेक महत्त्वाची माहिती सुरक्षा दलांना दिली आहे.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानची (Pakistan) गुप्तचर संस्था आयएसआय (ISI) काही केल्या आपल्या कुरापती थांबवत नाही आहेत. पाकिस्तान पुन्हा एकदा भारतावर (India) हल्ला करण्याचे नापाक मनसुबे रचत आहे. आयएसआयने (ISIS) अनेक दहशतवादी संघटनांसोबत (Terrorist Organization) झालेल्या बैठकीत जम्मू-काश्मीर आणि भारतात हल्ले करण्यासाठी नवीन गट तयार करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती समोर येत आहे. भारतातील हल्ल्यांची जबाबदारी या गटानेच घ्यावी अशा सूचनाही त्यांना देण्यात आली आहे.

मागील काही दिवसात भारतीय सैन्यापुढे आत्मसमर्पण केलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्याशी संबंधित अनेक महत्त्वाची माहिती सुरक्षा दलांना दिली आहे. (Pakistan planning to attack on India with the help of terrorist organization ISI)

पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या सूचनेनुसार अनेक दहशतवादी संघटना आत्मसमर्पण केलेल्या दहशतवाद्यांच्या संपर्कात आहेत. गेल्या 15 दिवसांत मारल्या गेलेल्या 12 दहशतवाद्यांमध्ये अनेक परदेशी दहशतवाद्यांसह दहशतवादी कमांडरचाही समावेश आहे. उरी आणि तंगधारमधून दहशतवादी कारवायांसाठी शस्त्रे आणि स्फोटके पुरवण्यास सांगण्यात आले आहे. ही माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांना पाकिस्तानकडून येणाऱ्या ड्रोनवर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे. यासोबतच एक हिटलिस्टही बनवण्यात आली आहे.

यापूर्वीही जम्मू-काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी हल्ले झाले आहेत, ज्यांना लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले आहे. कुलगाम जिल्ह्यात गुरुवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. पोलिसांनी सांगितले की, सुरक्षा दलांनी बुधवारी रात्री कुलगाम जिल्ह्यातील रेडवानी परिसराला घेराव घालून शोध मोहीम सुरू केली. त्यांनी सांगितले की, यावेळी दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला, ज्यावर सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिले आणि चकमक सुरू झाली. पहाटे झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला, आणि ही कारवाई अजूनही सुरू आहे.

दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे आणि ते कोणत्या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत हे शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. यापूर्वी सोमवारी श्रीनगर शहराच्या बाहेरील भागात दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीर सशस्त्र पोलिसांच्या बसवर गोळीबार केला होता. या हल्ल्यात 3 पोलिस शहीद झाले असून 12 जण जखमी झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

घरदुरुस्ती, विभाजन प्रक्रिया सोपी होणार; 'माझे घर' योजनेमुळे मयेवासीयांना मिळणार घरांचा मालकी हक्क

VIDEO: ट्रम्प यांचे भाषण सुरु असतानाच इस्रायली संसदेत राडा, 'पॅलेस्टाईनला मान्यता द्या'चे झळकले पोस्टर, घटनेचा व्हिडिओ व्हायरल!

गोव्याचे मुख्यमंत्री आणि पर्यटनमंत्री अडचणीत सापडणार? रामा काणकोणकरांच्या आरोपानंतर मारहाण प्रकरणाचा तिढा वाढला

Viral Video: "अपघात झाला तेव्हाच पठ्ठ्याला जाग आली", ट्रक अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल; नेटकरीही चकीत, म्हणाले...

IND vs WI 2nd Test: 12 वर्षांत पहिल्यांदाच! फॉलोऑननंतरही वेस्ट इंडीज संघाने केली कमाल, भारताविरुद्ध रचला धावांचा डोंगर; कॅम्पबेल चमकला VIDEO

SCROLL FOR NEXT