Pakistan:  Dainik Gomantak
देश

Pakistan: पाकिस्तानजवळ उरला फक्त तीन दिवसांचाच चलन साठा

Pakistan: पाकिस्तानची परिस्थिती इतकी वाईट झाली आहे की पाकिस्तान काही दिवसात डिफॉल्टर बनेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दैनिक गोमन्तक

Pakistan: पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली आहे. महागाईने पाकिस्तानच्या नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. पाकिस्तानची परिस्थिती इतकी वाईट झाली आहे की पाकिस्तान काही दिवसात डिफॉल्टर बनेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मागच्या आठ वर्षात परकीय चलन सगळ्यात कमी झाले आहे. एका रिपोर्ट नुसार, पाकिस्तानचे परकीय चलन 5 अरब डॉलर इतके झाले आहे जे पाठीमागच्या आठ वर्षात सगळ्यात कमी आहे. मिळालेल्या माहीतीनुसार, पाकिस्तानवर मोठ्या प्रमाणात परकीय कर्ज आहे. या आठवड्यात स्टेट बॅंक ऑफ पाकिस्तानने 245 अरब डॉलरचे आपले परकीय कर्ज फेडले त्यामुळे फॉरेक्स रिझर्वमध्ये मोठ्या प्रमाणात घट दिसून आली आहे.

आयएमएफ( IMF)कडून कर्ज मिळावे यासाठी पाकिस्तान सातत्याने प्रयत्न करत आहे. मात्र आयएमएफकडून कर्ज मिळवण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न विफल झाल्याचे दिसून येत आहे.या सर्व घडामोडींमुळे पाकिस्तान( Pakistan)च्या रुपयाचे अवमूल्यन झाले आहे. पाकिस्तान डिफॉल्टर होण्याच्या मार्गावर आहे.सरकार नागरिकांना परिस्थिती सुधारेल अशी आशा दाखवत आहे.

दरम्यान, पाकिस्तानमध्ये महागाई वाढली आहे. वस्तूंच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. एक सिलेंडर 10000 रुपए किमतीला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी एलपीजी( LPG) प्लास्टिकच्या पिशवीतून मिळत असल्याची माहीती समोर आली होती.

ही परिस्थिती सुधारली नाही तर पाकिस्तानच्या नागरिकांना मोठ्या प्रमाणाच झळ सोसावी लागेल. काही तज्ञांच्या माहीतीनुसार, सध्या पाकिस्तानजवळ पुढच्या तीन दिवसांचा खर्च उरला आहे. आता पाकिस्तानचे सरकार या आर्थिक संकटावर कशी मात करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Delhi Protest: आंदोलकांचा धूर अन् लोकशाहीचे अश्रू! 'क्रॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने फाडला व्यवस्थेचा बुरखा; जे. पी. नड्डांची मध्यस्थी ठरली उशिराची अक्कल?

History Of Hunger Strike in India: गांधीजींच्या सत्याग्रहापासून वांगचूक यांच्या उपोषणापर्यंत! भारतातील 'अहिंसक शस्त्रा'चा संघर्ष अन् सरकार समोरील मोठे आव्हान

खरी कुजबुज: ‘वाळवी’ने पेटवलेला वणवा

Narendra Sawaikar Post Controversy: तरुणांना 'वाळवी' संबोधल्याने गोव्यात राजकीय रणसंग्राम! सावईकरांच्या विधानावर काँग्रेस आक्रमक; माफी मागा, अन्यथा...

Goa Electricity: गोव्यातील वीज ग्राहकांसाठी गूड न्यूज! वीज बिलाचा शॉक टळला; 137 कोटींची तूट सावंत सरकार भरुन काढणार

SCROLL FOR NEXT