Swatantra Veer Savarkar Movie Dainik Gomantak
देश

Oscar 2025: Laapataa Ladies नंतर आणखी एक हिंदी चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत सामील; रणदीप हुडाच्या चित्रपटाला मिळाली एन्ट्री!

Swatantra Veer Savarkar Movie: बॉलिवूड स्टार रणदीप हुडाचा 'स्वातंत्र्य वीर सावरकर' हा चित्रपट यावर्षी 22 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.

Manish Jadhav

बॉलिवूड स्टार रणदीप हुडाचा 'स्वातंत्र्य वीर सावरकर' हा चित्रपट यावर्षी 22 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट वीर सावरकरांच्या राजकीय जीवनावर आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्यावर आधारित आहे. याचदरम्यान एक आनंदाची बातमी आली आहे. 'स्वातंत्र्य वीर सावरकर' या चित्रपटाला आता ऑस्कर 2025 साठी ऑफिशियली एन्ट्री मिळाली आहे. नुकतीच किरण रावचा 'लापता लेडीज' या चित्रपटाला ऑस्कर 2025 साठी ऑफिशियली एन्ट्री मिळाल्याची बातमी आली होती.

ऑस्करमध्ये ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ची एन्ट्री

22 मार्च 2024 रोजी रिलीज झालेला रणदीप हुडाचा 'स्वातंत्र्य वीर सावरकर' हा चित्रपटही ऑस्करसाठी ऑफिशियली सबमिट करण्यात आला आहे. आता या वृत्ताला अधिकृत दुजोराही मिळाला आहे. चित्रपटाच्या निर्मात्याने एक पोस्ट शेअर करुन ही खूशखबर दिली. निर्मात्याने पोस्टमध्ये लिहिले की, 'स्वातंत्र्य वीर सावरकर' ऑफिशियली ऑस्करसाठी पाठवण्यात आला आहे.

पोस्ट शेअर करताना निर्मात्याने पुढे लिहिले की, 'आमचा स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट ऑस्करसाठी ऑफिशियली सबमिट झाला आहे. याबद्दल भारतीय फिल्म फेडरेशनचे आभार. हा प्रवास अतुलनीय आहे. या काळात आम्हाला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाचे आम्ही आभारी आहोत.' आता ही पोस्ट पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. सर्वजण निर्माते आणि रणदीप हुडा याचे अभिनंदन करत आहेत. या चित्रपटात अंकिता लोखंडे महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: नो पार्किंगचा फलक काय कामाचा!

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT