Dainik Gomantak
देश

'भारत माता की जय' 'जय हिंद'च्या घोषणा; ऑपरेशन सिंदूरनंतर राजकीय नेत्यांचा भारतीय जवानांना सलाम

Political Leaders on Operation Sindoor: या कारवाईनंतर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सोशल मीडियाद्वारे भारतीय जवानांना सलाम केला आणि 'भारत माता की जय' तसेच 'जय हिंद'च्या घोषणा दिल्या.

Akshata Chhatre

नवी दिल्ली: भारतीय सशस्त्र दलांनी 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर केलेल्या यशस्वी हवाई हल्ल्यांचे देशभरातून कौतुक होत आहे. बुधवारी झालेल्या या कारवाईनंतर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सोशल मीडियाद्वारे भारतीय जवानांना सलाम केला आणि 'भारत माता की जय' तसेच 'जय हिंद'च्या घोषणा दिल्या.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, "मोदी सरकार भारतावर आणि येथील नागरिकांवर होणाऱ्या कोणत्याही हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी कटिबद्ध आहे. भारत दहशतवादाला मूळापासून नष्ट करण्याचा भारत सरकारचा दृढ निश्चय आहे."

भारताचे रक्षा मंत्री राजनाथ सिंग यांनी देखील भारत माता की जय असं म्हणत भारतीय सेनेकडून करण्यात आलेल्या हल्ल्याचं कौतुक केलं आहे.

विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे, "आपल्या सशस्त्र दलांचा अभिमान आहे. जय हिंद!"

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी जागतिक समुदायाला दहशतवाद खपवून न घेण्याचे आवाहन केले आहे.

गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी संस्कृत श्लोकाद्वारे अप्राप्यं नाम नेहास्ति धीरस्य व्यवसायिनः यासह 'भारत माता की जय!' आणि 'जय हिंद!' अशा घोषणा देत भारतीय जवानांच्या शौर्याला वंदन केले.

पहलगाममध्ये निष्पाप भारतीयांच्या झालेल्या क्रूर हत्येचा बदला घेण्यासाठी 'ऑपरेशन सिंदूर' हे भारताचे सडेतोड उत्तर आहे, असे मत अनेक नेत्यांनी व्यक्त केले आहे. या कारवाईमुळे भारतीय जनतेमध्ये समाधानाचे वातावरण आहे आणि भारतीय लष्कराच्या धैर्याचे आणि पराक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

Durand Cup Football: आशियातील सर्वात जुनी 135 वी 'ड्युरँड कप स्पर्धा' 25 जुलैपासून; पण सलग दुसऱ्या वर्षीही गोव्याचा एकही संघ मैदानात नाही

SCROLL FOR NEXT