नवी दिल्ली: भारतीय सैन्य दलाने पंधरा दिवसांत पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारताने पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक करत नऊ दहशतवादी तळ उद्धवस्त करण्यात आले आहेत. भारताने या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले आहे.
भारताने 100 हून अधिक दहशतवादी ठार केल्याची माहिती समोर आली आहे. पण, पाकिस्तानमध्ये भारताने दहशतवादी नव्हे तर सामान्य नागरिकांवर हल्ला केल्याची रडरड सुरु केली आहे. तसेच, भारताचे तीन जेट आणि एक ड्रोन खाली पाडल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे.
भारताने मुझफ्फराबाद, कोटली, गुलपूर, भिंबेर, सियालकोट, मुरीदके आणि बिलाल कॅम्प या ठिकाणी भारताने हल्ला केला आहे. या हल्ल्यात जैश ए मोहम्मदच्या हेडकॉर्टर आणि हिजबुल मुजाहिदिन्नचा अड्डा देखील उद्धवस्त करण्यात आला आहे. यात 100 हून अधिक दहशतवादी ठार झाल्याची माहिती मिळतेय.
दरम्यान, पाकिस्तान यात तीन भारतीय जेट आणि एक ड्रोन खाली पाडल्याचा दावा करत आहे. तसेच भारताने सहा ठिकाणी केलेल्या हल्ल्यात आठ जणांचा मृत्यू, ३५ लोक जखमी आणि दोनजण बेपत्ता झाल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.
"धूर्त शत्रूने पाकिस्तानमधील पाच ठिकाणी भ्याड हल्ले केले आहेत. भारताने लादलेल्या या युद्धाला जोरदार प्रत्युत्तर देण्याचा पाकिस्तानला पूर्ण अधिकार आहे आणि जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. संपूर्ण राष्ट्र पाकिस्तानी सशस्त्र दलांच्या पाठीशी उभे आहे आणि संपूर्ण पाकिस्तानी राष्ट्राचे मनोबल आणि आत्मा उंचावलेला आहे. पाकिस्तानी राष्ट्र आणि पाकिस्तानी सशस्त्र दलांना शत्रूशी कसे सामोरे जायचे हे माहित आहे. आम्ही शत्रूला त्यांच्या नापाक हेतूंमध्ये कधीही यशस्वी होऊ देणार नाही", अशी प्रतिक्रिया पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी दिली आहे.
दरम्यान, भारताने या एअर स्ट्राईक जगातील इतर देशांनी देखील याची माहिती दिली आहे. अमेरिकाचा राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली असून, "हल्ला करावा लागला हे खूप लज्जास्पद आहे. दोन्ही देश खूप दशकांपासून लढत आहेत. मला आशा आहे की हे लवकर संपेल", असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.