DGMO press briefing India Dainik Gomantak
देश

'Operation Sindoor'च्या पत्रकार परिषदेत किंग कोहलीचा उल्लेख; DGMO म्हणाले "आवडता खेळाडू..."

DGMO Press Conference: GMO कडून पत्रकार परिषद भरवण्यात आली जिथे भारतीय सैन्याचे DGMO राजीव घई यांनी विराटचा उल्लेख केला, काय म्हणाले DGMO जाणून घेऊया.

Akshata Chhatre

DGMO Virat Kohli Reference: भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. विराटने घातलेल्या तडकाफडकी निर्णयामुळे देशभरातील क्रिकेटप्रेमींना धक्का बसलाय. भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या वादग्रस्त स्थितीवर माहिती देण्यासाठी सोमवारी (12 मे) रोजी DGMO कडून पत्रकार परिषद भरवण्यात आली जिथे भारतीय सैन्याचे DGMO राजीव घई यांनी विराटचा उल्लेख केला, काय म्हणाले DGMO जाणून घेऊया.

"विराट माझ्या देखील आवडता खेळाडू"

भारताच्या सैन्यदलाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना भारतीय सैन्याचे DGMO राजीव घई यांनी विराट हा बाकी भारतीयांप्रमाणे त्यांचा देखील आवडता खेळाडू असल्याचं सांगितलं. भारतीय सैन्य दलाच्या शौर्याची माहिती देताना देखील त्यांनी क्रिकेटचं उदाहरण दिलं होतं.

भारतीय सैन्याचे DGMO राजीव घई यांनी पत्रकार परिषदेत बोलताना अ‍ॅशेस मालिकेचा उल्लेख केला. वर्ष 1970 च्या दशकात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अ‍ॅशेस दरम्यान दोन ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजीची फळी उद्ध्वस्त केली होती आणि तेव्हा एक म्हण प्रसिद्ध झाली होती, ती म्हणजे 'अ‍ॅशेसपासून अ‍ॅशेस, डस्टपासून डस्ट'. या म्हणाईचा उल्लेख करत त्यांनी पाकिस्तानवर निशाण साधला.

पाकिस्तानने जरी सर्व सिस्टीम ओलांडल्या तरीही लेयर ग्रिडमधील कोणतीही सिस्टीम एअरफील्ड, लॉजिस्टिक इन्स्टॉलेशन किंवा लक्ष्य करत असलेल्या कोणत्याही ठिकाणी पोहोचण्यापूर्वीच त्यांना पुन्हा खाली आणले जाईल असा त्या म्हणीचा छुपा अर्थ होता. आज भारतीय सैन्याने पाकिस्तानची दुर्दशा केली आहे आणि यापुढे होणारा कुठलाही हल्ला परतवून लावण्यासाठी भारतीय सेना सज्ज असल्याचं त्यांनी सांगितलं.

विराट कोहलीची भावनिक पोस्ट

"कसोटी क्रिकेटचा पोशाख घालून १४ वर्षे झाली. खरं सांगायचं तर, या फॉरमॅटमध्ये मला असा प्रवास करावा लागेल याची मी कधीच कल्पना केली नव्हती. या फॉरमॅटने माझी परीक्षा घेतली, मला घडवलं आणि आयुष्यभर मी जे सहन केलं त्याचे धडे दिले.

कसोटी क्रिकेट म्हणजे शांत खेळ, अनेक दिवस चालणारा, हे छोटे क्षण जे कोणीही पाहत नाही पण ते कायम खेळाडूच्या सोबत राहतात. मी या फॉरमॅटमधून बाहेर पडतोय पण ते सोपं नाही. मी माझ्याकडे जे काही होते ते सर्व दिलं आहे आणि या खेळाने मला माझ्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त परत दिलंय. निघून जाताना माझ्या मनात केवळ कृतज्ञाता आहे".

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'पाकिस्तान झिंदाबाद' फलकप्रकरणी हणजूण पोलिसांची मोठी कारवाई, 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल; व्हिस्की पीडिया स्टोअरचे मालक अडचणीत!

Goa Crime: 63 वर्षीय भाडेकरुची निर्घृण हत्या, डोंगर कापणीच्या तक्रारीतून अज्ञातांकडून मारहाण; मोरजीतील धक्कादायक घटना

IND vs SA: दक्षिण आफ्रिका टेस्ट सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा; ऋषभ पंतची धमाकेदार एंट्री; सोपवली उपकर्णधारपदाची जबाबदारी!

''माझी साथ विसरलास का?'', विराटच्या प्रेमात बनवली रील, कोहलीला 'बेवफाह' म्हणणाऱ्या पोस्टवर अनुष्काची लाईक; Video

Video: गोवा किंवा देशात पाकिस्तानच्या समर्थनाथ घोषणाबाजी देण्याचे कोणालाच धाडस नाही, तरुणांनी शांत राहावे; मायकल लोबो

SCROLL FOR NEXT