Operation Dost Video Dainik Gomantak
देश

Operation Dost Video: तुर्कीस्तानमध्ये भूकंपाच्या वेळी अभिमानाने तिरंगा फडकला, व्हिडिओ पाहून प्रत्येक भारतीयाला वाटेल अभिमान

भूकंपामुळे समस्येत असलेल्या तुर्कीस्तान आणि सीरियाच्या मदतीसाठी भारताने 'ऑपरेशन दोस्त' सुरू केले आहे.

दैनिक गोमन्तक

तुर्कस्तान आणि सीरियामध्ये विधवंसकारी भुकंप झाल्याने जीवित आणि वित्तहानी झाली आहे. भूकंपामुळे मृतांची संख्या 30,000 च्या पुढे गेली आहे. सर्वत्र विध्वंसाचे दृश्य असून ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, तिथे मदत करणाऱ्या भारतीय संघाचे सर्वत्र कौतुक होत आहे. भारतीय लष्कराने हेटे प्रांतात येथील एका शाळेच्या इमारतीत जखमींवर उपचार करण्यासाठी फील्ड हॉस्पिटल उभारले आहे. भारतीय जवानांनी शनिवारी या फील्ड हॉस्पिटलमध्ये तिरंगा फडकावला, जो पाहून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल.

भुकंपामुळे समस्येत असलेल्या तुर्कीस्तान आणि सीरियाच्या मदतीसाठी भारताने 'ऑपरेशन दोस्त' सुरू केले आहे. या ऑपरेशन अंतर्गत, भारतीय लष्कराने हेते या गावात 'फील्ड' हॉस्पिटलची स्थापना केली आहे.

या फील्ड हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया आणि आपत्कालीन वॉर्ड तसेच एक्स-रे लॅब आणि मेडिकल स्टोअर्स आहेत. या 60 पॅरा फील्ड हॉस्पिटलमध्ये तैनात असलेले सेकंड-इन-कमांड लेफ्टनंट कर्नल आदर्श म्हणतात, 'आम्हाला काल 350 रुग्ण आले, तर आज सकाळपासून 200 रुग्ण आले आहेत.'

अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करत असलेल्या तुर्की आणि सीरियाच्या मदतीसाठी सुरू झालेले हे 'ऑपरेशन दोस्त' लोकांची मने जिंकत आहे. भारतीय लष्कराने (Indian Army) गुरुवारी ट्विटरवर शेअर केलेल्या एका फोटोत त्याची झलक पाहायला मिळाली आहे. ज्यामध्ये एक महिला फील्ड हॉस्पिटलमध्ये कर्तव्यावर असलेल्या लष्करी जवानाला मिठी मारताना दिसत आहे.

भूकंपानंतर लगेचच भारताने मदतीचा हात पुढे केला आणि मंगळवारी चार लष्करी विमानांद्वारे मदत साहित्य, एक फिरते रुग्णालय, शोध आणि बचाव पथके तुर्कस्तानला पाठवली. यानंतर बुधवारीही मदत साहित्य पाठवण्यात आले.

गुरुवारी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्विटरवर भारताने तुर्कीमध्ये केलेल्या मदतकार्याची माहिती दिली. तेव्हा ते म्हणाले, सैन्याने तुर्कीमधील हेते गावातील इस्केंडरुन येथे एक फील्ड हॉस्पिटल उभारले आहे, ज्याने काम सुरू केले आहे आणि त्यात वैद्यकीय, शस्त्रक्रिया, आपत्कालीन वॉर्ड तसेच एक्स-रे लॅब आणि मेडिकल स्टोअर्स आहेत. ते म्हणाले की, 'ऑपरेशन दोस्त' अंतर्गत, बाधित लोकांना मदत देण्यासाठी लष्कराची टीम 24×7 काम करत आहे.

जयशंकर यांनी यापूर्वी भारताच्या नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF) च्या टीम्सने तुर्कीच्या गंजियातेपमध्ये शोध मोहीम सुरू केल्याचे फोटो शेअर केली होती. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, भारताने हवाई दलाच्या पाच C-17 विमानांमधून 250 हून अधिक कर्मचारी, विशेष उपकरणे आणि इतर साहित्य तुर्कीला पाठवले आहे, ज्यांचे एकूण वजन 135 टनांपेक्षा जास्त आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

SCROLL FOR NEXT