Only Woman Has Rights Over Her Body; The final Decision On Abortion Is For The Woman To Take, Supreme Court. Dainik Gomantak
देश

स्त्रीच्या शरीरावर फक्त तिचाच अधिकार, गर्भपाताचा अंतिम निर्णय महिलेनेच घ्यावा: सुप्रीम कोर्ट

जेव्हा पीडितेला लैंगिक अत्याचारानंतर झालेल्या गर्भधारणेमुळे मुलाला जन्म देण्यास भाग पाडले जाते तेव्हा त्याचा पीडितेसह तिच्या कुटुंबियांवर आणि आसपासच्या लोकांवर परिणाम होतो.

Ashutosh Masgaunde

Only Woman Has Rights Over Her Body; The final Decision On Abortion Is For The Woman To Take, Supreme Court:

एखाद्या महिलेचा स्वतःच्या शरीरावर फक्त तिचाच अधिकार आहे आणि तिला गर्भपात करायचा आहे की नाही याचा निर्णय सर्वस्वी तिचा असेल, यामध्ये इतर कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही. असे मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले.

25 वर्षीय बलात्कार पीडितेची गर्भधारणा संपुष्टात आणण्याची याचिका स्वीकारताना न्यायालयाने हे निरीक्षण केले.

न्यायमूर्ती बी.व्ही. नगररत्न आणि न्यायमूर्ती उज्जल भुईया यांच्या खंडपीठाने पीडितेच्या सध्याच्या याचिकेवर सुनावणी करताना हा आदेश दिला.

जेव्हा पीडितेला लैंगिक अत्याचारानंतर झालेल्या गर्भधारणेमुळे मुलाला जन्म देण्यास भाग पाडले जाते तेव्हा त्याचा पीडितेसह तिच्या कुटुंबियांवर आणि आसपासच्या लोकांवर परिणाम होतो.

त्यामुळे प्रत्येक महिलेला तिच्या स्वतःच्या शरीराशी काय करायचे आणि काय नाही याचा पूर्ण अधिकार आहे. असेही खंडपीठाने निदर्शनास आणून दिले.

गर्भपाताच्या संदर्भात अधिकारामध्ये गर्भधारणा संपुष्टात आणण्याच्या निर्णयासह, मूल जन्माला घालायचे की नाही याचा निर्णय घेण्याचा अधिकार फक्त त्या स्त्रीला आहे. मानवी सन्मान हा प्रत्येक व्यक्तीमध्ये जन्मजात असला तरी बाह्य परिस्थिती आणि राज्याने लादलेल्या कायद्यामुळे त्याचे उल्लंघन होण्याची शक्यता असते. कायद्याच्या अवाजवी हस्तक्षेपाशिवाय मूलाला जन्म द्यायचा की नाही याची निवड करण्याचा प्रत्येक स्त्रीचा अधिकार मानवी प्रतिष्ठेच्या कल्पनेचा केंद्रबिंदू आहे.
न्यायमूर्ती बी.व्ही. नगररत्न आणि न्यायमूर्ती उज्जल भुईया

न्यायालयाने नमूद केले की, गरोदर स्त्रीला आरोग्य सेवा नाकारणे, स्त्रीच्या भावनिक आणि शारीरिक आरोग्यासाठी हानिकारक असण्यासोबतच, स्त्रीच्या प्रतिष्ठेलाही हानी पोहोचवते.

या निकालात सर्वोच्च न्यायालयाने प्रजनन स्वायत्ततेच्या अधिकाराचे समर्थन करणाऱ्या मागील प्रकरणांचा संदर्भ दिला आहे.

गुजरात उच्च न्यायालयाने दिलासा नाकारल्यानंतर, खोट्या लग्नाच्या बहाण्याने बलात्कार झालेल्या पीडितेने गर्भपाताची मागणी केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने स्त्रीच्या परिस्थितीनुसार गर्भपात करण्याचा निर्णय घेण्याच्या अधिकाराला मान्यता दिली.

गेल्या शनिवारी याच खंडपीठाने 25 वर्षांच्या तरुणीचा खटला हाताळताना गुजरात उच्च न्यायालयाच्या उदासीन वृत्तीबद्दल ताशेरे ओढले होते.

आपल्या पेक्षा उच्च न्यायालयच्या निर्णयाविरुद्ध एखाद्या न्यायालयाने आदेश जारी केल्याचे देशात कुठेही घडत नाही. अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली होती.

गुजरातमध्ये बलात्कारानंतर २७ आठवड्यांच्या गर्भवती तरुणीला सर्वोच्च न्यायालयाने गर्भपात करण्याची परवानगी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BCCI Cricket: गोव्याचा माजी क्रिकेटपटू राष्ट्रीय निवड समितीवर, कृष्णा दास यांची नियुक्ती; बीसीसीआय ज्युनियर संघाची जबाबदारी

Florida Football Stadium Shooting: स्टेडियमजवळ अंदाधुंद गोळीबार; 6 अल्पवयीनांसह 12 जण जखमी, तिघांची प्रकृती गंभीर Watch Video

Viral Video: जन्मताच बाळाच्या वरच्या ओठांवर चक्क मिशा! व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, नेटकऱ्यांकडून मीम्सचा पाऊस

Rahul Gandhi: राहुल गांधी गोव्यात पुन्हा येणार; भाऊसाहेब बांदोडकरांच्या समाधीला भेट देणार का?

Cockroach Janata Party: 'विनाशकाले विपरीत बुद्धी!' तरुणाईच्या नव्या आंदोलनाची काँग्रेसला धास्ती?

SCROLL FOR NEXT