West Indies Record: भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा निकाल काहीही लागो, पण वेस्ट इंडीजच्या संघाने आपल्याला कोणीही कमी लेखू नये, हे निश्चितपणे सिद्ध केले. भारतीय कर्णधार शुभमन गिलची रणनीती चुकली किंवा वेस्ट इंडीजचा हुशार खेळ म्हणा, पण या सामन्यातून झालेल्या चुका भारतीय संघ पुढील काही वर्षांसाठी तरी निश्चितच टाळेल. सामन्याच्या चौथ्या दिवशी वेस्ट इंडीजच्या संघाने आपल्या चौथ्या डावात (फॉलोऑननंतरचा दुसरा डाव) 350 हून अधिक धावा करुन टीम इंडियाला अडचणीत आणले.
कमजोर मानल्या गेलेल्या वेस्ट इंडीजने टीम इंडियाला (Team India) चांगलेच झुंजवले. सामना तिसऱ्याच दिवशी संपेल, अशी अपेक्षा चाहते लावून बसले होते, पण वेस्ट इंडीजने असा 'कमबॅक' केला की सामना संपणे दूरच, नवीन विक्रम रचला गेला. भारतीय संघासोबत गेल्या 12 वर्षांत जे घडले नव्हते, ते दिल्ली कसोटीत घडले. भारताच्या फॉलोऑनचा सामना करणाऱ्या वेस्ट इंडीजच्या संघाने आपल्या चौथ्या डावात 350 हून अधिक धावा केल्या.
जानेवारी 2013 नंतर आजपर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये कधीही असे झाले नव्हते की कोणत्याही प्रतिस्पर्धी संघाने भारतासमोर आपल्या दुसऱ्या डावात 350 हून अधिक धावा केल्या असतील. विशेष म्हणजे, वेस्ट इंडीजने तर फॉलोऑननंतर ही अविश्वसनीय कामगिरी करुन दाखवली. यापूर्वी, जानेवारी 2013 मध्ये इंग्लंडच्या संघाने हैदराबादमध्ये आपल्या दुसऱ्या डावात 420 धावा केल्या होत्या.
वेस्ट इंडीजचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरला तेव्हा त्यांच्यावर मोठे दडपण होते. यानंतरही त्यांच्या सलामीवीरांनी दमदार कामगिरी केली. जॉन कॅम्पबेल (John Campbell) याने शानदार फलंदाजी करत 115 धावांची खेळी साकारली. शे होप (Shai Hope) यानेही त्याला चांगली साथ देत 103 धावा ठोकल्या आणि शतक पूर्ण केले. कर्णधार रोस्टन चेज (Roston Chase) यानेही 40 धावांचे महत्त्वाचे योगदान दिले. जस्टिन ग्रीव्स आणि जाइडेन सील्स या शेवटच्या जोडीनेही 50 हून अधिक धावांची भागीदारी करत संघाला एका मजबूत स्थितीत आणले.
वेस्ट इंडीजचा (West Indies) डाव एका वेळी गुंडाळला जाईल असे वाटत असतानाच शेवटच्या जोडीने 50 हून अधिक धावांची भागीदारी करुन संघाला एका सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. या दमदार कामगिरीमुळे वेस्ट इंडीजने केवळ 350 हून अधिक धावा केल्या नाहीत, तर भारताला चौथ्या डावात फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यामुळे भारतीय कर्णधार शुभमन गिलवर सामन्यातील 'फॉलोऑन'चा निर्णय घेतल्याबद्दल आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.