Rama Navami 2023 Ruckus Dainik Gomantak
देश

Rama Navami 2023 Ruckus: रामनवमीच्या दिवशी देशात विविध ठिकाणी शोभायात्रांवर दगडफेक, पेट्रोल बॉम्बचाही वापर

50 हून अधिक जणांना अटक

गोमंतक ऑनलाईन टीम

Rama Navami 2023 Ruckus: रामनवमीदिवशी म्हणजेच 30 मार्चला देशभरात अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना झाल्याचे समोर आले आहे. रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेवर दगडफेक, पेट्रोल बॉम्ब टाकल्याच्या घटना घडल्या आहेत.

गुजरात, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी प्रचंड गदारोळ झाला आहे. अनेक ठिकाणी हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटना घडल्या. देशभरात झालेल्या हिंसाचारात २२ जण जखमी झाल्याची माहिती आहे, तर पोलिसांनी ५४ जणांना अटक केली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.

पश्चिम बंगालमधील हावडा येथे समाजकंटकांनी रस्त्यावरील डझनभर वाहने जाळली. हिंसाचार आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या गोळ्यांचा वापर केला. पोलिसांनी १७ जणांना अटक केली. हावडा येथे रामनवमीला शोभा यात्रेदरम्यान रस्त्याच्या कडेला बांधलेल्या घरांवर दगडफेक झाल्याचा आरोप आहे.

पोलिस कर्मचारी उपस्थित होते, मात्र तक्रार करूनही कोणतीही कारवाई झाली नाही, असा ही आरोप आहे. तर शिवपुरीसह अन्य काही रस्त्यांवर हिंसाचाराची चित्रे पाहायला मिळाली.

गुजरातमधील वडोदरा येथे गुरुवारी दुपारी रामनवमीच्या मिरवणुकीवर दगडफेक झाली. त्यामुळे जल्लोषाचे वातावरण तणावात रूपांतरीत झाले. परिस्थितीचे गांभीर्य पाहून पोलिसांनी कारवाई करत दरोडेखोरांना पकडण्यास सुरुवात केली. पोलिसांनी २२ जणांना ताब्यात घेतले असून रात्रभर पोलिसांचा फ्लॅगमार्च सुरू होता.

सध्या या संपूर्ण परिसरात 200 हून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये महिला पोलिसांचाही मोठ्या संख्येने समावेश आहे. पाळत ठेवण्यासाठी डीसीपी दर्जाचे अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.

महाराष्ट्रातील संभाजीनगर येथे दोन गटात हाणामारी होऊन दगडफेक करण्यात आली. या गोंधळानंतर रामनवमीला शोभायात्रेदरम्यान पोलिस सतर्क झाले आणि ड्रोनद्वारे लक्ष ठेवले. यावेळी वाहनांची तोडफोड करण्यात आली आणि अनेक वाहनांना आग लावण्यात आली.

पोलिसांच्या वाहनांनाही आग लावण्यात आली. संभाजीनगरमध्ये मिरवणुकीपूर्वी गदारोळ झाला, मात्र मिरवणुकीदरम्यान पोलिसांच्या सतर्कतेमुळे परिस्थिती नियंत्रणात होती.

मुंबईच्या मालाड परिसरात दोन गट समोरासमोर येऊन 'श्रीराम'चा जयघोष करत असताना प्रचंड गदारोळ झाला. रामनवमीच्या मिरवणुकीत दोन गट समोरासमोर आले. एकीकडे शोभायात्रा निघत असताना आणि दुसरीकडे रमजान महिन्यात लोकांची प्रचंड गर्दी असताना हा गदारोळ झाला.

मालाडच्या मालवणी परिसरात बराच वेळ गदारोळ झाला होता. यावेळी दोन्ही बाजूंनी एकमेकांवर काही वस्तूही फेकण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मालवणी पोलीस ठाण्याबाहेर भाजप कार्यकर्ते ठिय्या आंदोलन करत होते आणि रात्री उशिरापर्यंत हा गोंधळ सुरू होता. मालवणी पोलिस ठाण्याबाहेरही भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

रामनवमीच्या मिरवणुकीवरून विद्यार्थी संघटना समोरासमोर आल्याने लखनौमध्ये गदारोळ झाला आणि रात्री उशिरापर्यंत हा गदारोळ सुरू होता.

राजस्थानमधील कोटा येथे रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान विजेचा धक्का लागून तिघांचा मृत्यू झाला. एका तरुणाच्या हाताने हायटेन्शन लाईनच्या वायरला स्पर्श केला आणि करंट पसरला. यात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

इंदूरमधील बेलेश्वर मंदिर दुर्घटनेत 34 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. इंदूर दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 75 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

SCROLL FOR NEXT