Jhulelal Temple Accident: इंदूर दुर्घटनेत आतापर्यंत 13 भाविकांचा मृत्यू, युद्धपातळीवर बचावकार्य सुरु

Jhulelal Temple Accident: स्नेह नगरजवळील पटेल नगर येथील श्री बेलेश्वर महादेव झूलेलाल मंदिरात छत कोसळल्याने 25 हून अधिक जण बावडीमध्ये पडले.
Jhulelal Temple Accident
Jhulelal Temple AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

Jhulelal Temple Accident: मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये रामनवमीच्या दिवशी मोठी दुर्घटना घडली. स्नेह नगरजवळील पटेल नगर येथील श्री बेलेश्वर महादेव झूलेलाल मंदिरात छत कोसळल्याने 25 हून अधिक जण बावडीमध्ये पडले.

दरम्यान, भाविकांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. अपघातानंतरही बराच वेळ अग्निशमन दल, रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचले नाहीत.

मात्र, काही लोकांनी कसेबसे भाविकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत 10 जणांना वाचवण्यात यश आले आहे.

त्यांना प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात (Hospital) पाठवण्यात आले आहे. इंदूरमधील बेलेश्वर महादेव मंदिरातील दुर्घटनेची मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दखल घेतली आहे. या अपघातात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे.

Jhulelal Temple Accident
Indore Temple Collapse: इंदूरमध्ये रामनवमीच्या दिवशी मोठी दुर्घटना, 10 जणांना वाचवण्यात यश; PM मोदी म्हणाले...

मुख्यमंत्री शिवराज यांनी सूचना दिल्या

इंदूरचे जिल्हाधिकारी, इंदूरचे आयुक्त यांच्याशी फोनवर चर्चा करुन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बचाव कार्याला गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मुख्यमंत्री कार्यालय इंदूर जिल्हा प्रशासनाच्या सतत संपर्कात आहे. घटनास्थळी इंदूर पोलिसांचे उच्च अधिकारी, जिल्हा प्रशासनाचे उच्च अधिकारी उपस्थित आहेत. भाविकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आत्तापर्यंत काही जणांची सुटका करण्यात आली आहे.

इंदूरमध्ये बचावकार्य सुरु आहे

विशेष म्हणजे, या अपघातानंतर परिसरात गोंधळाचे वातावरण आहे. बचावकार्य करणाऱ्या टीमसोबतच आजूबाजूच्या लोकांचीही गर्दी घटनास्थळी जमली आहे.

Jhulelal Temple Accident
Madhya Pradesh: ट्रान्सजेंडर्संना शिवराज मामा देणार मोठी भेट, सरकारी नोकरीचा मिळणार अधिकार

मंदिराची इमारत खूप जुनी

मंदिराच्या (Temple) आजूबाजूचे रस्ते अरुंद असल्याची समस्याही प्रशासनाच्या पथकाला भेडसावत आहे. गर्दी जमल्याने अडचण होत आहे. मंदिराची इमारत खूप जुनी होती. प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com