Omicron Subvariant Dainik Gomantak
देश

Omicron Subvariant: भारतात आढळला BA.4 व्हेरिएंट, कोरोना लाट येण्याची शक्यता

हैदराबादमध्ये ओमिक्रॉन सबवेरियंट BA.4 ची पहिल्या केसची पुष्टी करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

इंडियन SARS-CoV-2 Genomics Consortium (INSACAG) ने हैदराबादमध्ये आढळलेल्या ओमिक्रॉन सबवेरियंट BA.4 ची भारतामध्ये पहिल्या केसची पुष्टी करण्यात आली आहे. तसेच कोरोना विषाणूचा हा स्ट्रेन BA.2 सबव्हेरियंटसारखाच आहे. इंडियन SARS-CoV-2 Genomics Consortium (INSACOG) ने म्हटले आहे की हैदराबादमधील कोविड पॉझिटिव्ह व्यक्तीच्या नमुन्यात BA.4 Omicron प्रकार आढळून आला आहे. या व्यक्तीची टेस्ट 9 मे रोजी घेण्यात आली होती. (Omicron subvariant has been confirmed in Hyderabad)

Omicron च्या BA.4 आणि BA.5 प्रकारांना जानेवारीपासून दक्षिण आफ्रिकेतील पाचवी कोरोनाची लाट म्हटले जात आहे. या प्रकारांमुळे अमेरिका आणि युरोपमध्ये कोरोना संसर्गाची नवी लाट पसरली आली आहे. तर Omicron च्या BA.4 प्रकाराची माहिती भारतात पहिल्यांदाच समोर आली आहे.

BA.4 आणि BA.5 हे चिंतेचे प्रकार म्हणून घोषित केले

अगदी अलीकडे, 12 मे रोजी, युरोपियन सेंटर फॉर डिसीज प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल (ECDPC) ने BA.4 आणि BA.5 ओमिक्रॉन प्रकारांना चिंतेचे प्रकार (VoC) म्हणून घोषित करण्यात आले आहे. ECDPC, BA.4 आणि BA चा संदर्भ देत, असे म्हटले आहे की या प्रकारांचे स्पष्ट पुरावे आहेत जे संक्रमण, तीव्रता आणि प्रतिकारशक्तीवर लक्षणीय परिणाम करत आहेत.

जगातील अनेक देशांमध्ये या उपप्रकारामुळे कोरोनाची नवीन लाट आली आहे

Omicron चे BA.4 आणि BA.5 प्रकार प्रथम दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) आरोग्य अधिकाऱ्यांनी जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये नोंदवण्यात आले होते. आणि तेव्हापासून दक्षिण आफ्रिका, अमेरिका, यूके, जर्मनी आणि डेन्मार्क इत्यादी युरोपातील देशांमध्ये कोरोनाची नवीन लाट म्हणून या दोन्ही प्रकारांकडे पाहिले जात आहे. या देशांमध्ये कोरोनाच्या नवीन लाटेला ओमिक्रॉनचे सबवेरिएंट्सही कारणीभूत आहेत.

संशोधन अहवालाच्या आधारे, BA.4 आणि BA.5 उपप्रकार ओमिक्रॉनच्या मूळ प्रकारापेक्षा भिन्न आहेत, ज्यामुळे त्यांच्यात पूर्वीच्या संसर्गामुळे निर्माण झालेली प्रतिकारशक्ती कमी करण्याची क्षमता आहे. नवीन Omicron प्रकारांनी (BA.4 आणि BA.5) Omicron च्या BA.2 प्रकाराची जागा घेतली आहे, जो अनेक देशांमध्ये सक्रिय कोरोनाव्हायरस देखील होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs NZ T20: अभिषेक-सॅमसन जोडीचा धमाका! रोहित-राहुलचा मोडला 6 वर्ष जुना रेकॉर्ड; न्यूझीलंडमध्ये रचला नवा कीर्तिमान

Mohan Bhagwat Vijayadashami Speech: मोहन भागवतांचा 'विश्वगुरू भारताचा' मंत्र; विविधतेचा स्वीकार, समतोल विकास आणि संस्कारांवर भर

Kanpur Crime News: कारच्या छतावर बांधून दीड किमी फरफटत नेलं अन् नंतर चिरडलं... जुनी दुश्मनी ठरली जीवघेणी! कानपूरमध्ये तरुणाची निर्घुण हत्या VIDEO

Cricketer Suspension: न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सामन्यापूर्वी मोठा धक्का! स्टार खेळाडूवर निलंबनाची कारवाई; नेमकी काय चूक केली?

Congress Party: 'राहुल गांधींची सभा पार्किंगच्या जागेत, ही काँग्रेसची नामुष्की’; दिगंबर कामत यांचा टोला

SCROLL FOR NEXT