Omicron Dainik Gomantak
देश

ओमिक्रॉनचा धोका वाढला! जयपूरमध्ये 9 कोरोना पॉझिटिव्ह

राजस्थानच्या जयपूरमध्ये एकाच कुटुंबातील 9 लोक पॉझिटिव्ह आढळले आहेत, त्यापैकी 4 दक्षिण आफ्रिकेतून परतले असल्याचे बोलले जात आहे.

दैनिक गोमन्तक

omicron : दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमिक्रॉन विषणूच्या संसर्गाचा धोका भारतातही वाढला आहे. कर्नाटकातील दोन रुग्णांमध्ये ओमिक्रॉनची लक्षणे आढळली आहेत. त्यानंतर राज्य सरकारने नवीन कोविड मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. महाराष्ट्रातही 30 जणांचे नमुने तपासणीसाथी पाठवण्यात आले आहेत. अशातच राजस्थानच्या जयपूरमध्ये (Jaipur) एकाच कुटुंबातील 9 लोक पॉझिटिव्ह (Positive) आढळले आहेत, त्यापैकी 4 दक्षिण आफ्रिकेतून परतले असल्याचे बोलले जात आहे.

राजस्थानच्या जयपूरमध्ये एकाच कुटुंबातील 9 जणांना संसर्ग झाल्याचे आढळून आले असून त्यापैकी 4 जण दक्षिण आफ्रिकेतून एक दिवस आधी परतले होते. यामध्ये ओमिक्रॉनची चाचणी झालेली नाही, परंतु त्यांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या सर्व 9 लोकांना राजस्थान आरोग्य विज्ञान विद्यापीठात हलवण्यात येणार आहे.

कर्नाटकमधील दोन लोकांमध्ये ओमिक्रॉनची लक्षणे आढळली आहेत. त्यामुळे धोका आणखी वाढला आहे. कर्नाटकचे आरोग्य मंत्री डॉ. के सुधाकर म्हणाले की, दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉनचा धोका वाढीस लागल्यापासून 57 प्रवासी बेंगळुरूला परतले आहेत, त्यापैकी 10 अद्याप बेपत्ता आहेत. या 10 परदेशी प्रवाशांचा शोध लागत नाही तसेच त्यांचे फोनही बंद आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT