Girl Dainik Gomantak
देश

Madhya Pradesh Crime: माणुसकीला काळीमा! चॉकलेटचे आमिष दाखवून 2 सख्ख्या बहिणींवर बलात्कार

Madhya Pradesh Crime: मध्य प्रदेशातील जबलपूरमधून माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.

Manish Jadhav

Madhya Pradesh Crime: मध्य प्रदेशातील जबलपूरमधून माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. येथे एका 70 वर्षीय व्यक्तीने दोन अल्पवयीन मुलींसोबत जघन्य अपराध केला आहे.

या नराधमाने दोन्ही मुलींना चॉकलेटचे आमिष दाखवून त्यांच्यावर बलात्कार केला. आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी शुक्रवारी ही माहिती दिली.

पीडित दोघी सख्ख्या बहिणी आहेत

जबलपूर जिल्हा मुख्यालयापासून 45 किमी अंतरावर असलेल्या कटंगी भागात मंगळवारी दुपारी ही घटना घडली, असे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता दोघी सख्ख्या बहिणी असून त्यांचे वय 6 वर्षे आणि 8 वर्षे आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक (ग्रामीण) शिवेंद्र सिंह यांनी सांगितले की, आरोपी (Accused) गिरधारी लाल साहूने मंगळवारी दुपारी दोन बहिणींना त्यांच्या घराजवळ खेळताना पाहिले होते.

आरोपीला त्याच्या घरात नेले

अतिरिक्त पोलिस अधीक्षक (ग्रामीण) शिवेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मुलींना चॉकलेट देण्याच्या बहाण्याने घरात नेले आणि त्यांच्यावर बलात्कार केला.

त्यांनी पुढे सांगितले की, या मुली घरी न परतल्याने त्यांच्या ओळखीच्या व्यक्तींसह नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला असता त्या या नराधमाच्या घरी सापडल्या.

परिस्थिती पाहून कुटुंबीयांनी तक्रार केली

सिंह यांनी सांगितले की, त्यांची अवस्था पाहून या मुलींच्या नातेवाइकांनी पोलिसांना (Police) माहिती दिली आणि तक्रार दाखल केली.

ते पुढे म्हणाले की, पोलिसांनी या वृद्ध व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्यावर भारतीय दंड संहिता (आयपीसी) आणि लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण कायदा (पोक्सो) संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT