देश

Congress President Election: काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूकीची अधिसूचना जारी; 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत

राजस्थानचे मुख्यमंत्री असणारे गेहलोत यांच्या नावाची चर्चा

गोमन्तक डिजिटल टीम

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूकीची (Congress President Election) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. उमेदवारांना 24 ते 30 सप्टेंबर अर्ज सादर करता येईल. 01 ऑक्टोंबरला अर्जाची छाननी केली जाणार असून, 08 ऑक्टोंबर रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (CM Ashok Gehlot) आणि खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांची नावे समोर येत आहेत. तसेच, काँग्रेस मधील एक मोठा गट राहूल गांधी यांनीच अध्यक्षपदाची जबाबदारी घ्यावी अशी मागणी करत आहेत.

असा आहे काँग्रेस अध्यक्षपद निवडणूकीचा कार्यक्रम (Schedule of Congress President Election)

24 ते 30 सप्टेंबर - अर्ज सादर करण्याची मुदत

08 ऑक्टोंबर - अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत, याच दिवशी पात्र उमेदवारांची नावे जाहीर केली जातील

17 ऑक्टोंबर - या दिवशी सकाळी 10 ते 04 या वेळेत मतदान होईल.

19 ऑक्टोंबर - मतमोजणी आणि निकालाची घोषणा

अशोक गेहलोत, शशी थरूर, मनीष तिवारी का राहूल गांधी?

देशात काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत आहे. अध्यक्षपदासाठी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्व देशाचे लक्ष लागून राहिले आहे. राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेवरून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, खासदार शशी थरूर, मनीष तिवारी (Ashok Gehlot, Shashi Tharoor And Manish Tiwari) यांची नावे देखील निवडणूक लढवू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर, राहूल गांधी (Rahul Gandhi) यांनीच पक्षाची जाबाबदारी स्विकारावी अशी असाही एक वर्ग काँग्रेसमध्ये आहे. याशिवाय मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांचे देखील नाव समोर येत आहे.

दरम्यान, अशोक गेहलोत यांचे नाव अध्यक्षपदासाठी प्राधान्याने समोर येत आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री असणारे गेहलोत यांनी मुख्यमंत्री आणि अध्यक्षपद अशा दोन्ही जाबाबदाऱ्या पार पडण्याची तयारी दर्शवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT