Nupur Sharma Dainik Gomantak
देश

नुपूर शर्मांवर बनवला आक्षेपार्ह व्हिडिओ; काश्मीर खोऱ्यात एकाला अटक

युवकाला अटक केल्यानंतर त्याने मागितली माफी

दैनिक गोमन्तक

भाजप नेत्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. यामूळे देशभरात गेले काही दिवस जोरदार निदर्शने सुरू आहेत. यामध्ये उत्तर प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, बंगालमधील अनेक शहरांमध्ये लोक रस्त्यावर उतरल्याचं चित्र आहे. तसेच आज देशातील अनेक शहरात हिंसाचाऱाच्या घटना घडल्या आहेत. तर नुपूर शर्मा यांना धमक्या ही देण्याचे प्रकार सुरु आहेत. ( Offensive video made on Nupur Sharma; One arrested in Kashmir Valley )

काश्मीर खोऱ्यातील एकाने नुपूर शर्मांवर आक्षेपार्ह व्हिडिओ बनवल्याने पोलीसांनी त्याला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. काश्मीर खोऱ्यातील युट्युबर फैजल वाणीने नुपूर शर्मांबद्दल एक आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. मात्र, वाद वाढल्यानंतर फैजलने तो व्हिडिओ काढून टाकला. या व्हिडिओनंतर फैजलला अटक करण्यात आली असून त्याने माफीही मागितली आहे.

या यूट्यूबर अपलोड केल्यानंतर फैजल वाणी पोलिसांच्या रडारवर आला आहे. पोलिसांनी फैजलला अटक केली आहे. कारवाईनंतर घाबरलेल्या फैजलने तत्काळ माफी मागितली. आपल्या स्पष्टीकरणात फैसलने सांगितले की, चुकून त्याने हा व्हिडिओ बनवला आणि माझ्यामुळे जर कोणाचे मन दुखावले गेले असेल तर मला माफ करा, असेही तो म्हणाला.

फैसल वानी हा यूट्यूब चॅनल चालवतो. त्याने जून 2020 मध्ये हे यूट्यूब चॅनल सुरू केले होते शिवाय फैसल वाणी फेसबुक आणि इंस्टाग्रामवरही सक्रिय असून त्याचे हजारो फॉलोअर्स आहेत. आतात्याने हा व्हिडिओ तातडीने काढून टाकला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT