Ashwini Vaishnaw Dainik Gomantak
देश

Odisha Train Accident: रेल्वेमंत्र्यांचा 'हा' व्हिडिओ होतोय तूफान व्हायरल, तुम्हीही म्हणाल...

Odisha Train Accident: ओडिशातील भीषण रेल्वे अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. हा अपघात भारतीय रेल्वेच्या इतिहासातील सर्वात भीषण अपघातांपैकी एक आहे.

Manish Jadhav

Odisha Train Accident: ओडिशातील भीषण रेल्वे अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. हा अपघात भारतीय रेल्वेच्या इतिहासातील सर्वात भीषण अपघातांपैकी एक आहे. या दुर्घटनेत 288 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

तर 900 हून अधिक लोक अजूनही रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान, घटनास्थळावरुन केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचा व्हिडिओ समोर आला आहे. रेल्वे अपघाताचा आढावा घेण्यासाठी रेल्वेमंत्री आज सकाळी घटनास्थळी पोहोचले.

दरम्यान, मंत्री महोदयांनी अपघाताच्या (Accident) उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले असून सध्या बचाव कार्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्याचवेळी, त्यांनी अपघातस्थळाची पाहणी केली. त्याचबरोबर शोध आणि बचाव कार्य करणाऱ्या एनडीआरएफ अधिकाऱ्यांचीही त्यांनी भेट घेतली.

दुसरीकडे, शालीमार-चेन्नई कोरोमंडल एक्सप्रेसची टक्कर आणि बंगळुरु-हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस रुळावरुन घसरल्याबद्दल बोलताना अश्विनी वैष्णव म्हणाले की, "हा एक अतिशय दुःखद अपघात आहे.

रेल्वे, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत बचाव कार्य करत आहेत. आरोग्य सुविधा पुरवल्या जात आहेत.

काल भरपाई जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर, अपघातासंबंधी चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.''

ते पुढे म्हणाले की, "आमचे प्राधान्य बचाव आणि मदत कार्य करणे हे आहे. स्वतंत्र चौकशीच्या स्वरुपात रेल्वे सुरक्षा आयुक्तांद्वारे सविस्तर उच्चस्तरीय चौकशी केली जाईल." परिस्थितीचा आढावा घेत असताना, रेल्वेमंत्र्यांनी NDRF च्या अधिकार्‍यांची भेट घेतली.

तसेच, शोध आणि बचाव कार्य करण्यासाठी एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाने एकत्रितपणे काम केले. कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेन रुळावरुन घसरल्यानंतर 900 हून अधिक लोक जखमी झाले.

भुवनेश्वरच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 200 रुग्णवाहिका, 50 बसेस, 45 मोबाईल हेल्थ युनिट्स आणि 1,200 कर्मचारी आपत्तीच्या ठिकाणी काम करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Valvanti River Flood: नोव्हेंबरमध्ये आला गोव्यातील नदीला पूर; साखळीत वाळंवटी ओव्हरफूल

Goa Today's News Live: डिचोलीत बिबट्याची पुन्हा दहशत

Konkani Drama Competition: फसलेला प्रयोग, पिकिल्ली पानां तुटिल्ली मना; नाट्यसमीक्षा

Tripurari Poornima: वाळवंटीला पूर, साखळीत त्रिपुरारी पौर्णिमेची जय्यत तयारी; नौकानयन स्पर्धेला अवकाळी पावसाची भीती?

Rohan Bopanna Retirement: रोहन बोपण्णा वयाच्या 45 व्या वर्षी टेनिसमधून निवृत्त, भावनिक पोस्ट करत म्हणाला, 'निरोप, पण शेवट नाही...'

SCROLL FOR NEXT