Naba Das Death: ओडिशाचे आरोग्य मंत्री नबा किशोर दास यांच्यावर रविवारी जीवघेणा हल्ला झाला होता. ते एका कार्यक्रमाला गेले होते. गाडीतून उतरताच त्यांच्यावर एका पोलीस कर्मचाऱ्याने गोळीबार केला होता.
दास यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना भुवनेश्वरला हलविण्यात आले मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. संपुर्ण देशभरातून याबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, दास यांच्यावर ज्या पोलीस( Police) कर्मचाऱ्याने गोळ्या झाडल्या होत्या त्या पोलीस कर्मचाऱ्याला गंभीर आजार असल्याचे सांगण्यात येत आहे. गोपाल दास हा बायपोलर डिसऑर्डर या मानसिक आजाराने ग्रासलेला आहे.
150 मधला एका भारतीय या आजाराने पीडीत आहे. या आजाराबद्दल जागरुकता वाढत आहे तरीही 70 टक्के लोकांचा उपचार होऊ शकत नाही. डोपामाइन हार्मोन असंतुलित झाल्यामुळे हा आजार होतो. यामुळे व्यक्तीच्या स्वभावात बदल होतो. या आजारामुळे व्यक्तीला मूड स्वींग्ज होतात.
त्याचबरोबर, व्यक्तीला दोन प्रकारच्या डिप्रेशनचा सामना करावा लागतो. व्यक्ती एक तर मोठ्या प्रमाणात उत्साही होतो किंवा एकदम शांत होतो. या परिस्थितीला हाइपरमेनिया आणि हाइपोमेनिया असे म्हणतात. ओडिसा( Odisha)च्या आरोग्यमंत्र्यावर गोळ्या झाडलेल्या गोपाल दासने या आजारातूनच आरोग्यमंत्र्यावरगोळ्या झाडल्याचे म्हटले जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.