Geert Wilders & Nupur Sharma
Geert Wilders & Nupur Sharma Dainik Gomantak
देश

नेदरलँडच्या खासदाराने पुन्हा केले नुपूर शर्मांचे समर्थन, 'माफी मागू नका'

दैनिक गोमन्तक

Nupur Sharma Controversy: नुपूर शर्माने मुहम्मद पैंगबर यांच्यावर केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यावरुन निर्माण झालेला वाद अजूनही थांबण्याचे नाव घेत नाहीये. याप्रकरणी शुक्रवारी सुप्रीम कोर्टाने नुपूर शर्मा यांच्यावर केलेल्या टिप्पणीनंतर पुन्हा वाद सुरु झाला आहे. यावरुन भारतातील राजकारण तापले असून विरोधी पक्ष सातत्याने भाजपवर हल्लाबोल करत आहेत. मात्र, नूपूर यांच्या समर्थनार्थ बोलणाऱ्यांची काही कमी नाही. त्यांना भारतातूनच नव्हे तर इतर देशांतूनही मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. असाच एक पाठिंबा त्यांना नेदरलँडमधून मिळाला आहे. उजव्या विचारसरणीचे नेते आणि खासदार गीर्ट वाइल्डर्स यांनी पुन्हा एकदा नुपूर शर्माला पाठिंबा दिला आहे. गीर्ट वाइल्डर्स काय म्हणाले ते जाणून घेऊया...(Nupur Sharma Get Support From Netherlands Mp Geert Wilders On Prophet Muhammad Issue)

'उदयपूर घटनेला कट्टर मुस्लिम जबाबदार'

सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) टिप्पणीनंतर वाइल्डर्स यांनी आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले की, 'मला वाटले की भारतात शरिया न्यायालये नाहीत. पैगंबराबद्दल सत्य बोलल्याबद्दल त्यांनी कधीही माफी मागू नये. उदयपूरच्या (Udaipur) घटनेला त्या जबाबदार नाहीत. यास कट्टरपंथी असहिष्णु मुस्लिम जबाबदार आहेत.'

सुप्रीम कोर्ट नुपूर यांना काय म्हणाले?

नुपूर शर्माच्या (Nupur Sharma) वतीने शुक्रवारी सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल करण्यात आला होता. ज्यामध्ये या प्रकरणाबाबत देशभरात त्यांच्यावर दाखल असलेले गुन्हे दिल्लीला वर्ग करण्याची मागणी करण्यात आली. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने नुपूर शर्मा यांना फटकारले. उदयपूरमधील एका हिंदू टेलरच्या हत्येसह देशात जे काही घडत आहे त्यास त्या पूर्णपणे जबाबदार असल्याचे कोर्टाने म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन देशात खळबळ उडाली आहे. नुपूर यांना धोका आहे की त्यांच्या वक्तव्यामुळे देश धोक्यात आहे? जे काही होत आहे, त्याची आम्हाला जाणीव आहे, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. कोर्टाने नुपूर यांना माध्यमासमोर येऊन संपूर्ण देशाची माफी मागण्यास सांगितले आहे.

वाइल्डर्सने आधीच पाठिंबा दिला

गीर्ट वाइल्डर्सने (Geert Wilders) नूपूर यांना पाठिंबा देण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही ते नुपूर यांच्या समर्थनार्थ समोर आले आहेत. हा वाद सुरु झाला तेव्हाही त्यांनी नुपूर यांचा बचाव केला होता. त्यांनी म्हटले की, “भारतीय नेत्या नुपूर शर्मा यांनी पैगंबराविषयी सत्य बोलल्यामुळे अरब आणि इस्लामिक देश संतापले हे खूपच मजेदार आहे. भारताने माफी का मागावी? तुष्टीकरण कधीही काम करत नाही. त्यामुळे गोष्टी आणखी वाईट होतात. त्यामुळे माझ्या भारताच्या (India) मित्रांनो, मुस्लिम देशांच्या धोक्यात पडू नका. स्वातंत्र्यासाठी उभे राहा आणि तुमच्या नेत्या नुपूर शर्मांच्या रक्षणाचा अभिमान बाळगा.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT