Agni-4  Dainik Gomantak
देश

भारताची गगनभरारी, अग्नी-4 क्षेपणास्त्राची केली यशस्वी चाचणी

भारताने अग्नी-4 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे.

दैनिक गोमन्तक

भारताने अण्वस्त्र हल्ला करण्यास सक्षम असलेल्या अग्नी-4 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे. संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, त्याची यशस्वी चाचणी आज म्हणजेच 6 जून रोजी ओडिशातील एपीजे अब्दुल कलाम बेटावर करण्यात आली. स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडच्या नेतृत्वाखाली त्याची चाचणी घेण्यात आली.

दरम्यान, अग्नि-4 ची रेंज 4000 किमी आहे. प्रक्षेपणाने सर्व ऑपरेशनल पॅरामीटर्स तसेच संरक्षण प्रणालीची विश्वासार्हता सत्यापित केली आहे. ही यशस्वी चाचणी भारताच्या ''क्रेडिबल मिनिमम डिटेरेंस' क्षमतेच्या धोरणाची पुष्टी करते. याआधी भारताने (India) अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता असलेल्या अग्नी-5 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे. त्याची रेंज 5000 किमी होती.

तसेच, भारतीय नौदलाने (Indian Navy) नुकतेच "सीकिंग हेलिकॉप्टर" वरुन स्वदेशी बनावटीच्या पहिल्या जहाजविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. ओडिशातील बालासोर येथील एकिकृत चाचणी श्रेणी (ITR) त ही चाचणी घेण्यात आली. त्याच वेळी, भारतीय नौदल आणि अंदमान निकोबार कमांडने संयुक्तपणे 'सुपरसॉनिक क्रूझ' क्षेपणास्त्र ब्रह्मोसच्या जहाजविरोधी आवृत्तीची यशस्वी चाचणी घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT