Rahul Gandhi Bungalow: काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सरकारी बंगला सोडण्यासाठी नोटीस देण्यात आली होती. संसदेचे सदस्यत्व रद्द केल्यानंतर लोकसभेच्या सभागृह समितीने ही नोटीस जारी केली आहे. राहुल गांधी 12 तुघलक लेन येथील सरकारी बंगल्यात राहतात.
राहुल गांधी यांना 22 एप्रिलपर्यंत त्यांचे अधिकृत निवासस्थान रिकामे करावे लागणार आहे. नोटीशीनुसार, अपात्रतेनंतर एक महिन्याच्या आत राहुल गांधी यांना त्यांचे अधिकृत निवासस्थान रिकामे करावे लागेल.
सुरतच्या एका न्यायालयाने गुरुवारी राहुल गांधी यांना 'मोदी आडनावा'वरून केलेल्या टिपण्णीबद्दल 2019 मध्ये दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवले आणि त्यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. यानंतर शुक्रवारी राहुल गांधी यांना लोकसभेच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरवण्यात आले.
लोकसभा सचिवालयाच्या अधिसूचनेत म्हटले आहे की, त्यांचा अपात्रतेचा आदेश 23 मार्चपासून लागू होईल. त्यांना (राहुल गांधी) संविधानाच्या कलम 102 (1) आणि लोकप्रतिनिधी कायदा, 1951 च्या कलम 8 अंतर्गत अपात्र ठरवण्यात आले आहे.
काँग्रेसचे खासदार प्रमोद तिवारी म्हणाले की, राहुल गांधींबद्दल भाजपचा द्वेष दिसून येत आहे. नोटीस दिल्यानंतर 30 दिवसांच्या कालावधीसाठी, ती व्यक्ती त्याच घरात राहू शकते. 30 दिवसांनंतर बाजारभावाने भाडे देऊन त्याच घरात राहता येते.
खासदारकी रद्द झाल्यावर पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले होते की, खासदार असो वा नसो किंवा तुरुंगात टाकले तरी लोकशाहीसाठी लढत राहू. आपण घाबरत नाही आणि माफी मागणार नाही. उद्योगपती गौतम अदानी यांनी 20 हजार कोटी रुपये शेल कंपनीत ठेवले आहेत.
तो पैसा कोणाचा आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी अदानी यांना का वाचवत आहेत. संसदेतील माझे पुढचे भाषण अदानींवर करणार असल्याच्या भीतीतून मला अपात्र ठरवले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.