Uttar Pradesh Dainik Gomantak
देश

Uttar Pradesh: हनिमूनला जाण्यासाठी पठ्ठ्यानं केली लाखोंची चोरी, परत येताच पोलिसांनी दाखवला इंगा

Uttar Pradesh Crime: मुरादाबाद जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या चोरीच्या घटनेबाबत पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी एका चोरट्याला अटक केली आहे.

Manish Jadhav

Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातील कोतवाली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. मुरादाबाद जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या चोरीच्या घटनेबाबत पोलिसांनी आता मोठा खुलासा केला. पोलिसांनी एका चोरट्याला अटक केली आहे.

पोलिसांनी चोरट्याची चौकशी केली असता त्याने सांगितले की, 'त्याचे काही दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. त्यानंतर दोघांना हनिमूनला जायचे होते. पहाडी भागात जाऊन हनिमून साजरा करावा, अशी पत्नीची इच्छा होती. परंतु आर्थिक विवंचनेमुळे मी खूपच अस्वस्थ होतो.'

यानंतर तरुणाने चोरीची घटना घडवून आणली. आरोपीने 1 लाख 90 हजार रुपये चोरले. यासोबतच माढोळा परिसरातून एक बुलेट बाईकही चोरली.

चोरीचे पैसे घेऊन हनिमूनला गेला

दरम्यान, चोरीचे लाखो रुपये घेऊन हा तरुण पत्नीसह मुरादाबादहून हनिमूनसाठी हिमाचल प्रदेशला रवाना झाला. यादरम्यान त्याने आपला फोनही बंद केला. याठिकाणी शहरातील चोरीच्या घटनांबाबत पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेत होते.

पोलिसांनी (Police) अनेक सीसीटीव्ही स्कॅन केल्यानंतर आरोपीचा फोटो समोर आला. त्यानंतर पोलिसांची सर्व्हिलान्स टीम सक्रीय झाली.

मुरादाबादला येताना फोन ऑन केला

हनीमूनला गेल्यानंतर आरोपीने त्याचा फोन बंद केला होता. आरोपी हनीमूनहून मुरादाबादला परतला आणि फोन चालू करताच त्याला सर्व्हिलान्स टीमच्या मदतीने अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपीची (Accused) चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा मान्य केला.

दुचाकीवरुन सात 45 हजार रुपये जप्त केले

दुसरीकडे, आरोपीने पैशांसोबत एक दुचाकीही चोरल्याचे सांगितले. पोलिसांच्या सांगण्यावरुन दुचाकी जप्त करण्यात आली. यासोबतच त्याच्याकडून 45 हजार रुपयेही जप्त करण्यात आले आहेत. मुरादाबादच्या कोतवाली पोलिसांनीही आरोपीची तुरुंगात रवानगी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: ट्रेनसमोर अचानक आली अन्...; महिलेचा थरारक ड्रामा व्हायरल; नेटकरी म्हणाले, "ही लोको पायलटची बायको तर नाही ना?"

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

Zodiac Personality Traits: खिशाला कात्री लावणे यांच्या रक्तातच नाही! 'या' 3 ग्रहांचे राजे पैशांच्या बाबतीत का असतात एवढे कडक?

SCROLL FOR NEXT