Khushabu Sundar Dainik Gomantak
देश

Khushabu Sundar: जे सांगितले त्याची लाज वाटत नाही... वडिलांकडून लैंगिक शोषणाबाबत भाजप नेत्याचे वक्तव्य

जयपूरमधील कार्यक्रमात केला होता धक्कादायक खुलासा

Akshay Nirmale

Khushabu Sundar: पुर्वाश्रमीच्या अभिनेत्री आणि सध्या भाजपमध्ये सक्रीय असलेल्या नेत्या खुशबु सुंदर यांनी नुकतेच जयपूर येथे मोजो स्टोरीतर्फे आयोजित ‘वी द वुमन’ कार्यक्रमात धक्कादायक खुलासा केला होता.

15 वर्षांची असताना वडिलांनीच माझे लैंगिक शोषण केले होते, असे खुशबु सुंदर म्हणाल्या होत्या. त्यानंतर आता खुशबु यांनी जे सांगितले त्याची लाज वाटत नाही, असे वक्तव्य केले आहे.

खुशबू या राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यही आहेत. खुशबु म्हणाल्या की, मी जे सांगितले त्याची मला आता लाज वाटत नाही. मी जे काही बोलले ते अजिबात आश्चर्यजनक नाही. मी प्रामाणिकपणे माझ्यासोबत जे घडले ते सांगितले. मला याबाबत अजिबात लाज वाटत नाही. गुन्हेगाराला लाज वाटली पाहिजे.

एएनआयशी बोलताना खुशबु म्हणाल्या की, महिलांनी त्यांच्यासोबत जे घडले आहे ते समोर येऊन सांगितले पाहिजे. मला हाच संदेश द्यायचा आहे की, महिलांना मजबून बनले पाहिजे. तुम्हाला कुणीही कमी लेखू शकत नाही. काहीही होवो, मी माझ्या आयुष्याचा प्रवास सुरूच ठेवणार आहे.

लहानपणी लैंगिक शोषणाला सामोरे जावे लागल्यानंतर तेव्हाच खुशबु यांनी वडिलांच्या या कृत्याला विरोध करणे सुरू केले. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी त्यांच्या कुटूंबाला वाऱ्यावर सोडले होते.

ही गोष्ट मला दीर्घकाळापासून सतावत होती. मी ही गोष्ट विसरू शकत नाही. मी माफही करणार नाही. पण हे मागे सोडून मी पुढे जाईन. जेव्हा एखाद्या लहान मुलाचे किंवा मुलीचे लैंगिक शोषण होते तेव्हा ते त्याला आयुष्यभर त्रास देत राहते.

मला मी माझ्या वडिलांविरोधात उभी राहिले याचा अभिमान वाटतो. कारण तेव्हा जर ठामपणे विरोध करू शकले नसते तर आज मी जिथे आहे तिथे नसते. मी घरात पुरूषांशी लढू शकत होते, त्यामुळेच जगात वावरतानाही मी या संकटांचा सामना सहज करू शकत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यात रंगणार 9वा 'Aqua Goa Mega Fish Festival'; मच्छिमारांच्या प्रगतीसाठी 40% सबसिडीची घोषणा

अग्रलेख: गोवा मुक्तीच्या 60 वर्षांनंतरही आपल्याला शेतं, डोंगर, पाण्याचे स्रोत, समुद्र किनारे यावर चर्चा करावी लागते, यासारखे दुर्दैव नाही

Harvalem: 'रवींच्या स्वप्नासाठी भंडारी समाजाने एकत्रित यावे'! ब्रह्मेशानंद स्वामींचे आवाहन; रुद्रेश्वर रथयात्रा वर्षपूर्ती सोहळा साजरा

ऑफिसमध्ये फक्त कामच! कामाच्या वेळी 'बर्थडे' आणि 'फेअरवेल' साजरे करण्यावर बंदी

Goa Live News: तुये हॉस्पिटल 100% 'जीएमसी'शी जोडले जाणार

SCROLL FOR NEXT