Noida Crime: राजधानी दिल्लीला लागून असलेल्या नोएडामध्ये एका शाळकरी मुलीसोबत वर्गात अनेकवेळा अश्लील वर्तन केल्याची घटना समोर आली आहे.
पीडित मुलगी सेक्टर-100 मधील एका नामांकित शाळेतील इयत्ता 11वीची विद्यार्थिनी आहे. तिच्या वर्गात शिकणाऱ्या पाच मुलांनी तिच्यासोबत घाणेरडे कृत्य केल्याचा आरोप विद्यार्थिनीने केला आहे. यानंतर तिला मारहाणही करण्यात आली.
पोलिसात तक्रार करण्यापूर्वी विद्यार्थिनीने शाळेचे मुख्याध्यापक आणि संचालकांना ईमेलद्वारे माहिती दिली होती. विद्यार्थिनीने ईमेलमध्ये सर्व गोष्टी सांगितल्या होत्या, ज्यामुळे ती नाराज होती. मात्र शाळा व्यवस्थापनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. आता विद्यार्थिनीचे ईमेल समोर आले आहेत.
'इंडियन एक्स्प्रेस'च्या वृत्तानुसार, विद्यार्थिनीने (Student) सर्वप्रथम 9 ऑक्टोबरला शाळेच्या मुख्याध्यापकांना ई-मेल लिहिला होता. ज्यामध्ये तिने लिहिले होते की, 'एक मुलगा माझा लैंगिक छळ करत आहे. त्याने अपशब्दांचा प्रयोग केला.
यादरम्यान त्याचे मित्र हसत होते. त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. कृपया या संदर्भात काहीतरी करा.' विद्यार्थिनीने हा ईमेल इंग्रजी लिहिला होता. विशेष म्हणजे, हा मेल तिने तीन शिक्षक आणि शाळेच्या संचालकांनाही पाठवला होता.
मुख्याध्यापकांकडे तक्रार केल्यानंतर पीडितेने दुसऱ्या दिवशी शाळेच्या संचालकांना मेल लिहिला. ज्यामध्ये तिने लिहिले होते की, 'हा ईमेल काल दुपारी घडलेल्या एका घटनेशी संबंधित आहे. त्या मुलाने प्रथम मला त्याच्या बेंचवर बोलावले. तिथे त्याने मला एका मुलाला किस करण्यास सांगितले. तो वारंवार त्या मुलाला किस करायला सांगत होता.
जेव्हा मी तसे करण्यास नकार दिला तेव्हा त्याने मला त्याच्या एका मित्रासोबत संभोग करण्यास सांगितले. त्यानंतर मी तिथून निघाले, पण यादरम्यान ते मला शिवीगाळ करत होते.
ते लोक माझ्या शरीरावर कमेंट करत होते. वारंवार नकार देऊनही ते मला त्रास देत होते, धमक्या देत होते. ते लोक माझी चेष्टा करत होते आणि खिदळत होते.'
मिळालेल्या माहितीनुसार, शाळेतील (School) मुलांना मेल लिहिल्यानंतर याची माहिती मिळाली. यानंतर मुलांनी पीडितेला शाळेतच पकडून बेदम मारहाण केली. विशेष म्हणजे, त्यांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप पीडितेच्या वडिलांनी केला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. शाळेतील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. मुलीसोबत अश्लील कृत्य करणारे पाचही मुले अल्पवयीन आहेत.
एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, शाळेला नोटीस पाठवण्यात आली आहे. याप्रकरणी शाळा व्यवस्थापनाकडून उत्तर मागवण्यात आले आहे. शाळेतील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. विद्यार्थिनीचे आणि सर्व आरोपींचे जबाब लवकरच दंडाधिकाऱ्यासमोर नोंदवले जातील. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.