मुंबई- शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य संस्था, NMIMS Global यांनी आपल्या स्थापनेपासूनच कार्यकारी व्यावसायिकांना (Working professionals) आपल्या डिस्टन्स आणि ऑनलाईन कोर्सेसद्वारे शिक्षणाच्या अनेक नवीन संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत. ही संस्था, २०२३ पर्यंत ५ लाखांपेक्षा अधिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या तयारीत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून NMIMS Global ही संस्था यशाची हमी देत आली आहे.
Work – Life चा ताळमेळ
NMIMS Global एक खरीखुरी ऑनलाईन युनिव्हर्सिटी ठरण्यासाठी सर्व प्रकारचे मानांकन पूर्ण करते. त्यामुळे ती इतर संस्थांपेक्षा अनेक अर्थाने वेगळी ठरते. बॅचलर्स, मॅनेजमेंट आणि टेक कोर्सेस ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करुन दिले जातात. वेब बेसड् लर्निंग अॅप आणि मोबाईल ॲपच्या माध्यमातून याचा लाभ घेतला जाऊ शकतो. देशभरातील विविध ८०० ठिकाणी राहणाऱ्या कार्यकारी व्यावसायिकांना (Working professionals) दर्जेदार शिक्षण घेता येणे शक्य झालंय.
आतापर्यंत जवळपास 1 लाख विद्यार्थ्यांनी NMIMS Global मध्ये विविध कोर्सेससाठी नोंदणी केली आहे 17 हजारांहून अधिक माजी विद्यार्थ्यी मिळालेल्या कौशल्याच्या आधारावर विविध ठिकाणी काम करत आहेत. संस्थेचे विद्यार्थी भारतातील विविधतेचे प्रतिनिधित्व करतात. हे सर्व विद्यार्थी Tier 1 शहरे त्याचबरोबर भारतातील ग्रामीण भागातून येतात. माजी विद्यार्थ्यांचे अनुभव, निपुण प्राध्यापक वर्ग, अद्ययावत होत राहणारा अभ्यासक्रम, विद्यार्थी सेवा आणि कॉरपोरेट क्षेत्रातील ओळख यामुळे विद्यार्थ्यांनी NMIMS Globalला पसंती दिली आहे.
NMIMS Global चे सीईओ आणि संचालक श्री राजीव शाह सांगतात की, 'सध्याच्या प्रोफेशनला गरजेचे असलेले सर्व कौशल्य NMIMS ग्लोबल पुरवत आहे. संस्थेला आतापर्यंत जगातील आणि देशातील ७५०० पेक्षा जास्त कॉरपोरेट आणि लघु आणि मध्यम उद्योगांनी मान्यता दिली आहे. NMIMS Global चे विद्यार्थी आज अॅमेझॉन, एचसीएल, एचपी, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज, हिंदूस्तान युनिलीवर, एचडीएफसी बँक, उबर आणि टीसीएस अशा अग्रगण्य कॉरपोरेट कंपन्यांमध्ये मोठ्या पदावर काम करत आहेत.' संस्था ऑनलाईन शिक्षण पुरवत असल्याने अनेकांना वर्क-लाईफचा ताळमेळ साधणे शक्य होतंय. तसेच जॉब करतानाही विविध कोर्सेस करता येत आहे.
मान्यताप्राप्त कोर्सेस
National Assessment and Accreditation Council (NAAC) एनएएसीने, SVKM’s NMIMS ला ग्रेड A+ रँकिंग दिली आहे. यावरुन संस्थेचे भारतातील सर्वोच्च मानक सिद्ध होते. NMIMS Global नवीनतम आणि उपयोगी असे कोर्सेस पुरवत आहे. संस्थेकडून भारताच्या शैक्षणिक भविष्याला आकार दिला जात असून कार्यकारी व्यावसायिकांना (Working professionals) देखील याचा लाभ घेण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. तुम्हीही विविध कोर्सेसाठी online.nmims.edu वर नोंदणी करु शकता.
NMIMS Global विषयी
NMIMS Global भारतातील एक प्रमुख ऑनलाईन आणि डिस्टन्स शैक्षणिक संस्था आहे. उभारणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेला मॅनजमेंट प्रोफेशनल्स पुरवण्यासाठी संस्थेने १९९४ मध्ये आपले काम सुरु केले होते. SVKM’s NMIMS संस्था मान्यताप्राप्त असून संस्थेच्या समावेश भारतातील सर्वोत्तम बिझनेस-संस्थांमध्ये सातत्याने होत असतो. एमबीए, अप्लाईड साईन्समध्ये एमएससी, प्रोफेशनल डिप्लोमा, इंडस्ट्री स्पेसिफिक डिप्लोमा, सर्टिफिकेट कोर्सेस आणि B.Com/BBA हे कोर्सेस NMIMS Global विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देत आहे.
सकाळ एज्युकेशन एक्स्पो 2021 या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ऑनलाइन शैक्षणिक मार्गदर्शन मेळाव्याचे 10 ते 12 ऑगस्ट या कालावधीत आयोजन केले आहे. यामध्ये NMIMS Global सुद्धा विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे आणि शंकांचे निरसन करणार आहे. सकाळ एज्युकेशन एक्स्पो 2021 मध्ये मोफत नोंदणीसाठी www.sakalexpo.com या संकेतस्थळाला भेट द्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.