Kanpur, Uttar Pradesh Crime News Dainik Gomantak
देश

Kanpur Crime: हनिमूननंतर गोव्याहून परतले नवविवाहित जोडपे; घरी पोहोचताच नवरदेवाचा मृत्यू; पत्नीची चौकशी होणार

Kanpur Uttar Pradesh: माघारी आल्यानंतर सोनाली माहेरी लखनऊमध्येच थांबली आणि आकाश कानपूर येथील घरी परतला होता.

Pramod Yadav

कानपूर: हनिमूननंतर गोव्याहून परतलेल्या नवरदेवाचा मृत्यू झाल्याची घटना कानपूर, उत्तरप्रदेश येथून समोर आली आहे. नवविवाहित जोडप्याचे 12 दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. नवरदेवाचा मृत्यू कशामुळे झाला याची माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर येईल, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.

एका प्रसिद्ध हिंदी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, आकाश सिंह (वय 32, रा. कानपूर, उत्तर प्रदेश) असे मृत नवरदेवाचे नाव आहे. आकाशचा लखनऊ येथील सोनाली हिच्याशी गेल्या ०९ डिसेंबर रोजी विवाह झाला होता. लग्नानंतर दोघांनी हनिमूनसाठी गोव्याला जाण्याचा निर्णय घेतला होता. गोव्यात हनिमून साजरे केल्यानंतर दोघेही माघारी परते. माघारी आल्यानंतर सोनाली माहेरी लखनऊमध्येच थांबली आणि आकाश कानपूर येथील घरी परतला.

शुक्रवारी (२० डिसेंबर) रात्री घरी आल्यानंतर आकाश झोपी गेला. दरम्यान, शनिवारी दुपारी त्याचा मित्र त्याच्या घरी आला तर आकाश बेडवर पडल्याचे दिसून आले. मित्राने आकाश जागे करण्याचा प्रयत्न केला पण, त्याने प्रतिसाद दिला नाही. मित्राने तात्काळ आकाशला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, डॉक्टरांनी आकाशला मृत घोषित केले. घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी आकाशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

शवविच्छेदनानंतर आकाशच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येईल, अशी माहिती पोलिसांनी वृत्तपत्राला दिली आहे. आकाशने हनिमूनवरुन आल्यानंतर आत्महत्या केल्याचा दावा देखील केला जात आहे. याबाबत, त्याच्या पत्नीची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. आकाशच्या आई - वडिलांचा मृत्यू झाला असून, त्याचा भाऊ कामानिमित्त ऑस्ट्रेलियात असतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोवा बीचवर बायकोशी झाला वाद, नवऱ्याने जीव द्यायला समुद्रात घेतली धाव; मदतीला आलेल्या जीवरक्षकालाही केली मारहाण

Karnataka Bus Accident: भीषण अपघात! बस लॉरी ट्र्कवर जाऊन आदळली; तिघांचा जागीच मृत्यू, 7 जण गंभीर

Goa Live Updates: मुंगुल प्रकरण, आणखी 2 आरोपींना अटक

Surya Gochar 2025: पैसे मिळणार, करिअर सुधारणार; 'सूर्य गोचर' तुमच्या राशीला काय देणार?

Vote Chori: गोव्यात सापडले नेपाळी मतदार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांचा Ground Survey

SCROLL FOR NEXT