Indian Constitution  Dainik Gomantak
देश

आंबेडकर नव्हे संविधान निर्मितीत नेहरुंचे योगदान जास्त; सुधींद्र कुलकर्णी यांच्या लेखाने नवा वाद

Sudheendra Kulkarni: भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे माजी निकटवर्तीय सुधींद्र कुलकर्णी यांनी शनिवारी एक लेख लिहून वाद निर्माण केला.

Manish Jadhav

Indian Constitution: देशात मागील दिवसांपासून मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. यातच आता, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे माजी निकटवर्तीय सुधींद्र कुलकर्णी यांनी शनिवारी एक लेख लिहून वाद निर्माण केला. त्यांनी लिहिले की, ''भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी संविधान निर्मितीमध्ये बीआर आंबेडकरांपेक्षा जास्त योगदान दिले होते.''

दरम्यान, एका वृत्तसंस्थेने प्रकाशित केलेला हा लेख काँग्रेसचे प्रमुख नेते सॅम पित्रोदा यांनीही फेसबुकवर शेअर केला होता, जो नंतर हटवण्यात आला. यावर भाजपने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. भाजपने म्हटले की, त्यांचे हे कृत्य "लज्जास्पद" आणि दलित आणि आंबेडकरविरोधी आहे. केंद्रीय मंत्र्यांसह भाजप नेत्यांनी आरोप केला की, दलित आणि आंबेडकरांबद्दल काँग्रेसचा "द्वेष" नवीन नाही. विरोधी पक्ष अजूनही लेखाला "समर्थन" देऊन "त्यांचा वारसा पुसून टाकण्याचा" प्रयत्न करत आहे.

केंद्रीय न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल म्हणाले की, पित्रोदा यांनी दावा केला होता की संविधान बनवण्यात नेहरुंचेच योगदान आंबेडकरांपेक्षा जास्त आहे. मेघवाल पुढे म्हणाले की, 'आम्ही याचा तीव्र निषेध करतो आणि काँग्रेस आपल्या वक्तव्यावर ठाम आहे का, असा प्रश्नही विचारतो.'

ते पुढे म्हणाले की, 'संविधान निर्मितीत बी.आर. आंबेडकरांनी महत्त्वाची भूमिका बजावली असे संपूर्ण जग मानते. मात्र त्यांच्या योगदानावर पित्रोदा यांनी केलेले भाष्य हे बाबासाहेबांचा अपमान करण्याच्या काँग्रेसच्या मानसिकतेचे प्रतिबिंब आहे.' त्याचबरोबर, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी काँग्रेस 'आंबेडकर आणि दलितविरोधी' असल्याचा आरोप केला. काँग्रेसच्या दलितविरोधी विचारसरणीचा पुरावा पुन्हा एकदा समोर आला असल्याचे ते म्हणाले.

पूनावाला यांनी पित्रोदा यांच्या वक्तव्याला 'खोटे' ठरवत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना विचारले की त्यांच्या पक्षाच्या नेत्याने राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची 'मन की बात' खरोखर व्यक्त केली आहे का? काँग्रेसच्या राजवटीत दलित आणि आदिवासींवर खूप अत्याचार झाल्याचा दावा यावेळी भाजपच्या प्रवक्त्याने केला. त्याचबरोबर 'अनुसूचित जाती-जमातींच्या सदस्यांचा आणखी किती अपमान होणार?', असा सवालही खर्गे यांना त्यांनी विचारला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

SCROLL FOR NEXT