NDA Passing out pared in Pune Army chief M. M. Naravane chief guest Video  Twitter @ANI
देश

NDA चा दिमाखदार दिक्षांत सोहळा,पहा VIDEO

पुण्यात (Pune) आज राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (NDA) 141 व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा संपन्न झाला.

दैनिक गोमन्तक

पुण्यात (Pune) आज राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (NDA) 141 व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लष्कर प्रमुख (Army Chief) जनरल एम एम नरवणे (M. M. Naravane) उपस्थित होते. या प्रसंगी एनडीएचे प्रमुख लेफ्टनंट जनरल असित मिस्त्री, दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जय सिंह नैन, आदी मान्यवर उपस्थित होते.(NDA Passing out pared in Pune Army chief M. M. Naravane chief guest Video)

या सोहळ्यावेळी बोलताना लष्करप्रमुखांनी, 'आता आम्ही महिला कॅडेट्सना एनडीएमध्ये घेत आहोत, मला आशा आहे की तुम्ही सर्व त्यांचे अधिक चांगल्या पद्धतीने स्वागत कराल. जसजसे आम्ही पुढे जाऊ, तसतसे आम्ही एनडीएमध्ये महिला कॅडेट्सचा समावेश करू आणि मला खात्री आहे की ते पुरुष कॅडेट्सप्रमाणेच कामगिरी करतील तसेच स्त्री-पुरुष समानतेच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल आहे आणि देशातील अशा सर्व उपक्रमांमध्ये लष्कर नेहमीच आघाडीवर असते.' असे मत देखील व्यक्त केले आहे.

आज भारतीय लष्करप्रमुख एमएम नरवणे यांनी पुण्यातील पासिंग आऊट परेडचा आढावा घेतला. यावेळी लष्करप्रमुखांनी खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 141 व्या दीक्षांत सोहळ्याप्रसंगी भारतीय सैन्याची डोळे दिपवणारी परेड देखील पाहायला मिळाली. NDA ची ही चौथी पासिंग आऊट परेड होती कोरोना महामारीच्या निर्बंधांमुळे अकादमीने शेवटच्या तीन परेडसाठी पाहुणे आणि माध्यमांना आमंत्रित केले नव्हते आज मात्र कोरोनाचे नियम पाळत ही परेड आयोजित करण्यात आली होती.

या सोहळ्यात लष्करप्रमुखांना भारतीय सैन्यातर्फे हवाई मानवंदनाद देखील देण्यात आली.

एनडीए ही भारतीय सशस्त्र दलांची नेहमीच आघाड बळ राहिलं आहे, परंतु गेल्या काही वर्षांत या दलात मोठे बदल करण्यात आले आहेत. या काळात शिकवण्याच्या पद्धती बदलल्या, ज्यामुळे आम्हाला भविष्यात येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी अधिक प्रशिक्षित आणि अधिक सुसज्ज बनवले गेले.असे सांगताना समाधान देखील त्यांनी व्यक्त केले आहे.

NDA च्या या सोहळ्यात लष्कर प्रमुख जनरल एम एम नरवणे यांनी मांडलेले महत्वाचे मुद्दे-

  • महिलांना एनडीएत संधी दिली ही आनंदाची बाब आहे

  • आर्मीत कोणताही भेदभाव केला जाणार नाही

  • मुलांप्रमाणे मुलीही एनडीएतून प्रशिक्षण घेउन चांगल काम करतील हे नक्की

  • 3 हजार विद्यार्थी एनडीएतून पास आऊट झाले आहेत

  • सध्या चेन्नईत महिला प्रशिक्षण घेतायेत, मुलींच्या प्रशिक्षणामध्ये आणि मुलांच्या प्रशिक्षणात कोणताही बदल नसेल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला

  • मात्र मूलींसाठी नव्याने काही उपाययोजना कराव्या लागतील त्या मी नक्की करेल असे अश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले आहे.

  • सायबर सुरक्षितता हा महत्वाचा विषय आहे...आमच्या स्तरावर आम्ही सेमिनार आयोजित करून त्यांना सायबर सुरक्षिततेच्याबाबतीत प्रशिक्षण दिलं जातंय,

  • भारताच्या आर्मीकडे अत्याधुनिक सुविधा उपलब्ध,शस्त्रसाठा उपलब्ध आहे जो जगात कोणाकडेही नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सा जुझे दी आरियाल पुन्हा चर्चेत; पंचायत समोरील संत जोसेफ यांच्या पुतळ्याची विटंबना करुन चोरी

'पाठीत खंजीर खुपसला पण काँग्रेससोबत एकत्र लढण्यास तयार'; आप नेते पालेकरांचे काँग्रेस नेत्यांना चर्चेचे आवाहन

India vs Pakistan: पाकड्यांचा पराभव अटळ! हेड-टू-हेड आकडेवारीत टीम इंडियाचा वरचष्मा, सूर्याची 'ब्लू आर्मी' करणार कमाल

Sanquelim Market Robbery: फसवणुकीचा नवा फंडा! साखळीत वृद्ध भाजीविक्रेत्या महिलेला दिवसाढवळ्या लुबाडले, लंपास केली सोन्याची पाटली आणि साखळी

Sonam Wangchuck Arrested: लेह हिंसाचारानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना 'NSA' अंतर्गत अटक

SCROLL FOR NEXT