India|Plastic Pollution  Canva
देश

Plastic Pollution: प्लास्टिक प्रदूषणाच्या बाबतीत भारताच्या नावावर नकोसा 'रेकॉर्ड'; चीन, नायजेरियाही अग्रेसर!

Plastic Pollution Report: जगात निर्माण होणाऱ्या प्लास्टिक कचऱ्यापैकी एक पंचमांश कचरा फक्त भारतात निर्माण होतो ही धक्कादायक बातमी उघड झाली आहे

गोमन्तक डिजिटल टीम

नेचर जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासानुमते भारत प्लास्टिक प्रदूषणात सर्वात मोठा योगदान देणारा देश बनल्याचे समोर आले आहे. जगात निर्माण होणाऱ्या प्लास्टिक कचऱ्यापैकी एक पंचमांश कचरा फक्त भारतात निर्माण होतो ही धक्कादायक बातमी यातून उघड झाली आहे. दरवर्षी भारतात 93 कोटी टन इतका प्लास्टिक कचरा निर्माण होतो.

दरम्यान, नेचर जर्नलमधून ही धक्कादायक बातमी समोर येताच भारताच्या नावावर एक नकोसा रेकॉर्डही नोंदवला गेला. याबाबतची कारणे आणि उपाययोजनांकडे आता गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. संशोधकांच्या निष्कर्षानुसार एकत्रित न केला जाणारा कचरा आणि कचरा जाळण्याच्या सवयी प्रदूषण संकटाचे प्रमुख कारण आहेत. भारतात याचे प्रमाण सर्वाधिक आहे. भारतातील प्लॅस्टिक प्रदूषणापैकी 53 टक्के प्रदूषण हे एकत्रित न केलेल्या कचऱ्यातून होते तर 38 टक्के कचरा उघड्यावर जाळल्यामुळे होते असे या अभ्यासातून समोर आले आहे.

वर्षभरात जगात निर्माण होणारा प्लास्टिक कचरा न्यूयॉर्क शहराच्या सेंट्रल पार्कमध्ये भरण्याइतका तसेच एम्पायर स्टेट बिल्डिंग एवढा ढीग करण्यासाठी पुरेसा आहे. भारतानंतर नायजेरिया, इंडोनेशिया आणि चीन (China) हे सर्वाधिक प्रदूषण करणारे देश आहेत, असे या अभ्यासातून समोर आले आहे.

संशोधकांनी ही यादी बनवताना जगातील नगरपालिकांमधील स्थानिक माहितीचा संदर्भ घेत हा अभ्यास केलेला आहे. त्यात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (Central Pollution Control Board) 2020-21 घनकचरा व्यवस्थापन अहवालाचाही (Solid Waste Management Report) उल्लेख करण्यात आला आहे.

भारताची लोकसंख्या प्लास्टिक कचरा प्रदूषणाबाबतीत अग्रेसर बनत असताना देशातील दरडोई प्लास्टिक निर्मिती तुलनेने कमी आहे. भारत प्लास्टिक प्रदूषणात दरडोई आधारावर 127 व्या क्रमांकावर आहे.

संशोधकांचा असा अंदाज आहे की भारतात दरवर्षी 56.8 दशलक्ष मेट्रिक टन घनकचरा जाळला जातो त्यापैकी 5.8 दशलक्ष प्लास्टिक कचरा आहे.

संशोधकांनी जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक उपाय सुचवले आहेत. त्यांच्या शिफारशींमध्ये कचरा संकलन व्यवस्था आणि कचरा पुनर्वापर प्रणालीसाठी पायाभूत सेवासुविधा सुधारणे आणि प्लास्टिक उत्पादनांचे पुनर्वापर करून उत्सर्जन कमी करणे असे उपाय समाविष्ट आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या 'श्रुती'ला दिलासा; फोंडा कोर्टाकडून जामीन!

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांनी दिला दणका, सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

SCROLL FOR NEXT