National Film Awards Winners List Dainik Gomantak
देश

National Film Awards Winners List: 71 व्या चित्रपट पुरस्कारांची घोषणा; 'ट्वेल्थ फेल' सर्वोत्तम चित्रपट, 'नाळ-2'चाही यथोचित सन्मान

National Film Award: केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा केली असून दिग्दर्शक विधु विनोद चोप्रा यांचा ‘ट्वेल्थ फेल’ हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे.

Sameer Amunekar

नवी दिल्ली: केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा केली असून दिग्दर्शक विधु विनोद चोप्रा यांचा ‘ट्वेल्थ फेल’ हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. हे पुरस्कार २०२३ या वर्षासाठी जाहीर झाले आहेत. ‘जवान’ चित्रपटासाठी शाहरुख खान, तर ‘ट्वेल्थ फेल’साठी विक्रांत मेस्सी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार विभागून, तर ‘मिसेस चटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ या चित्रपटासाठी राणी मुखर्जीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.

‘नाळ-२’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बालचित्रपट या श्रेणीत, तर भाषिक चित्रपटांच्या श्रेणीत मराठी विभागात सुजय सुनील डहाके दिग्दर्शित ‘श्‍यामची आई’ या चित्रपटाला गौरविण्यात आले आहे.

अभिनेते, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या अध्यक्षतेखालील फिचर फिल्म ज्युरी आणि पी. शेषाद्री यांच्या अध्यक्षतेखालील नॉन फिचर फिल्म ज्युरी मंडळाच्या समित्यांनी पुरस्कार विजेत्यांची निवड केली. दोन वर्षांपूर्वी भारतासह देशभरात प्रदर्शित झालेल्या ‘जवान’मधील शाहरुख खानच्या अभिनयाचे कौतुक झाले होते.

तसेच, विक्रांत मेस्सीचा अभिनय असलेला ‘ट्वेल्थ फेल’ही चित्रपट रसिकांच्या पसंतीस उतरला होता. या अभिनयाबद्दल या दोन्ही कलाकारांना गौरविण्यात आले आहे. ‘केरला स्टोरी’ या चित्रपटासाठी सुदिप्तो सेन यांना सर्वोत्तम दिग्दर्शकाचा पुरस्कार देण्यात आला आहे.

या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांचाही ठसा उमटलेला आहे. केवळ सुधाकर रेड्डी यक्कांती यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘नाळ-२’ला सर्वोत्कृष्ट बालचित्रपट म्हणून गौरविण्यात आले.

मराठी विभागात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान ‘श्‍यामची आई’ला मिळाला. तसेच, कबीर खंदारे (जिप्सी) याच्यासह त्रिशा ठोसर, श्रीनिवास पोकळे आणि भार्गव जगताप (नाळ-२) यांनाही सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे. पदार्पणातील सर्वोत्तम दिग्दर्शकासाठीचा पुरस्कार ‘आत्मपॅम्फ्लेट’ या मराठी चित्रपटासाठी आशिष बेंडे यांनाही गौरविण्यात आले आहे.

हे यश केवळ माझे एकट्याचे नसून, आमच्या संपूर्ण टीमच्या मेहनतीचे फलित आहे. परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी, आनंद एल. राय आणि झी स्टुडिओज्‌ यांच्यासह संपूर्ण टीमने घेतलेल्या परिश्रमामुळेच हे शक्य झाले. - आशिष बेंडे, दिग्दर्शक (आत्मपॅम्फ्लेट)

प्रमुख विजेते

सर्वोत्कृष्ट अभिनेता : शाहरुख खान (जवान) आणि

विक्रांत मेस्सी (ट्वेल्थ फेल)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : राणी मुखर्जी (मिसेस चटर्जी व्हर्सेस नॉर्वे)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : सुदिप्तो सेन (द केरला स्टोरी, हिंदी)

सर्वोत्कृष्ट चित्रपट : ट्वेल्थ फेल (दिग्दर्शक- विधु विनोद चोप्रा)

सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री : उर्वशी (उल्लोझुक्कू, मल्याळम), जानकी बोडीवाला (वश, गुजराती)

सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता : विजय राघवन (पुक्कलम, मल्याळम) आणि मुथुपेट्टई सोमू भास्कर (पार्किंग, तमिळ)

सर्वोत्कृष्ट मेकअप आर्टिस्ट : श्रीकांत देसाई (सॅम बहादूर)

सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाईनर : सचिन लोवलेकर,

दिव्या गंभीर आणि निधी गंभीर (सॅम बहादूर)

सर्वोत्कृष्ट बालचित्रपट : नाळ २

(दिग्दर्शक : सुधाकर रेड्डी यक्कांती)

सर्वोत्कृष्ट बालकलाकार (विभागून): सुकृती वेनी बंदरेड्डी

(गांधी तथा चेट्टू,तेलुगू), कबीर खंदारे (जिप्सी, मराठी), त्रिशा ठोसर, श्रीनिवास पोकळे आणि भार्गव जगताप (नाल २, मराठी)

पदार्पणातील सर्वोत्तम दिग्दर्शकासाठीचा पुरस्कार :

आशीष बेंडे (आत्मपॅम्फ्लेट, मराठी)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

शेवटच्या श्वासापर्यंत देशसेवा करणाऱ्या पर्रीकरांबाबतही ते खोटे बोलले होते; अरुण जेटलींनी धमकी दिल्याचा राहुल गांधींचा दावा हास्यास्पद - प्रमोद सावंत

Handwriting Competition: 'गोमंतक'तर्फे 40 दिवसांची राज्यस्तरीय हस्तलेखन स्पर्धा; आकर्षक बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी

America-Russia Tension: 'रशियासोबत अणुयुद्धासाठी अमेरिका तयार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानं खळबळ; जागतिक राजकारण तापलं VIDEO

बँक कर्ज देण्यास मनाई करत असेल तर तक्रार करा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे शेतकऱ्यांना आवाहन

Goa News Live Update: माजी खासदार प्रज्वल रेवन्ना यांना जन्मठेपेची शिक्षा

SCROLL FOR NEXT