National Anthem mandatory in schools Dainik Gomantak
देश

सरकारी समारंभ, शाळांमध्‍ये 'राष्ट्रगान' अनिवार्य; 'राष्ट्रगीता'आधी सहा कडव्यांचे गायन होणार, नवीन दिशानिर्देश जारी

Education: केंद्र सरकारने ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगानाच्या अनुषंगाने काही नवीन दिशानिर्देश जारी केले आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: केंद्र सरकारने ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगानाच्या अनुषंगाने काही नवीन दिशानिर्देश जारी केले आहेत. शाळांतील कार्यक्रम तसेच महत्त्वाच्या सरकारी समारंभांमध्ये ‘राष्ट्रगीता’च्या आधी राष्ट्रगानाच्या सर्व सहा कडव्यांचे गायन अनिवार्य असेल.

ज्याप्रमाणे ‘राष्ट्रगीता’चा सन्मान ठेवण्यात येतो त्याचप्रमाणे या ‘राष्ट्रगाना’चा देखील आदर ठेवावा लागेल. हा नियम सिनेमागृहांसाठी मात्र लागू नसेल.

काँग्रेसने ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगानातील चार कडवी १९३७ मध्ये हटविली होती. या गीताला पूर्वीची प्रतिष्ठा मिळवून देण्याच्या उद्देशाने आता सर्व सहा कडव्यांचे गायन करणे केंद्र सरकारने अनिवार्य केले आहे.

अशी आहेत मार्गदर्शक तत्त्वे

राष्ट्रगानाच्या सर्व सहा कडव्यांचे गायन अनिवार्य

‘राष्ट्रगीता’च्या आधीच ‘राष्ट्रगाना’चे गायन करायला हवे

‘राष्ट्रगाना’वेळी सर्वांनी सावधान अवस्थेत उभे राहावे (काही अपवाद)

देशभरात सर्व शाळांत ‘राष्ट्रगाना’चे गायन अनिवार्य

मूळ गीतात सहा कडवी : बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी १८७५ मध्ये ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रगान लिहिले होते. ‘आनंदमठ’ पुस्तकात १८८२ मध्ये ते प्रसिद्ध करण्यात आले होते. मूळ गीतामध्ये सहा कडवी आहेत. सुरुवातीच्या कडव्यांमध्ये भारतमातेचे चित्रण असून त्यानंतर दुर्गा, कमला (लक्ष्मी) आणि सरस्वती या हिंदू देवी-देवतांचा उल्लेख करण्यात आला आहे.

मुस्लिम नेत्यांचा आक्षेप : काही मुस्लिम नेत्यांनी ‘वंदे मातरम्’ मधील हिंदू देवी-देवतांच्या उल्लेखाला आक्षेप घेतल्यानंतर काँग्रेसने १९३७ मध्ये फैजपूरच्या अधिवेशनात केवळ पहिल्या दोन कडव्यांचा अंगीकार केला होता. नव्या आदेशानुसार आता सहा कडवी गायली जाणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT