PM Modi's Swearing-in Ceremony
PM Modi's Swearing-in Ceremony Dainik Gomantak
देश

PM Modi's Swearing-in Ceremony: नरेंद्र मोदींचा विक्रमी तिसरा विजय अमेरिकेतील 22 शहरांमध्ये होणार साजरा; उद्या शपथविधी सोहळा!

Manish Jadhav

PM Modi's Swearing-in Ceremony: यंदाच्या लोकसभा निवडणूक अनेक अर्थांनी खास ठरली. नरेंद्र मोदींनी आपल्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा भाजप आणि एनडीएला विजय मिळवून देऊन इतिहास रचला. 9 जून रोजी ते विक्रमी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. 1962 मध्ये देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यानंतर, पंतप्रधान मोदी हे दुसरे पंतप्रधान असतील जे सलग दोन कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर पुन्हा हे पद भूषवणार आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या या दणदणीत विजयाची जय्यत तयारी अमेरिकेतही करण्यात आली आहे.

ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ बीजेपी (OFBJP-USA) च्या वरिष्ठ नेत्याने सांगितले की, नरेंद्र मोदी यांचे समर्थक त्यांचा तिसरा शपथविधी सोहळा साजरा करतील. मोदींचा तिसरा शपथविधी सोहळा न्यूयॉर्क, न्यू जर्सी सिटी, वॉशिंग्टन, बोस्टन, टँपा, अटलांटा, ह्यूस्टन, डॅलास, शिकागो, लॉस एंजेलिस आणि सॅन फ्रान्सिस्को या शहरांमध्ये साजरा केला जाईल, असे त्यांनी सांगितले. OFBJP-USA चे अध्यक्ष अदापा प्रसाद यांनी PTI शी बोलताना सांगितले की, "या शुक्रवारपासून ते पुढील रविवारपर्यंत अमेरिकेतील 22 शहरांमध्ये त्यांचा विजय साजरा केला जाईल."

पीएम मोदींनी 1962 च्या रेकॉर्डची पुनरावृत्ती केली

भारतीय जनता पक्ष (BJP) हा लोकसभेतील सर्वात मोठा पक्ष आहे आणि 1962 नंतर पंतप्रधान सलग तिसऱ्यांदा सत्तेवर येण्याची ही पहिलीच वेळ आहे. मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत, जे 60 वर्षांत प्रथमच असेल. प्रसाद म्हणाले की, ‘’भारतात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर OFBJP-USA भारत-अमेरिका संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेने काम करेल. आम्ही भारत-अमेरिका संबंध मजबूत करण्यासाठी भारतीय डायस्पोरा म्हणून एकत्र काम करु.’’ ते पुढे म्हणाले की, ‘’परदेशी भारतीयांशी संबंधित सर्व समस्यांसाठी ते पंतप्रधानांना अनिवासी भारतीय (एनआरआय) आयोग स्थापन करण्याची विनंती करतील.’’

प्रसाद शेवटी म्हणाले की, ‘’परदेशात राहणाऱ्या भारतीयांना मालमत्तेशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. आम्ही एनआरआय आयोग स्थापन करण्याची मागणी करत आहोत, जो या समस्यांचे निराकरण करेल.’’

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panjim Police: रझिया गँगच्या दोघांना गोव्यातील हॉटेलमधून अटक; चोरीचे 3.75 लाखांचे दागिने जप्त

Goa Todays Live Update: म्हादईच्या पात्रात मोठी वाढ!

Merces: मेरशी गॅस गळती प्रकरण; क्लोरिन सिलिंडर आला कुठून? 15 दिवसांत उत्तर द्या

Goa Beach: गोव्यातील समुद्र किनाऱ्यावरील हालचालीवर येणार निर्बंध; बीचच्या धारण क्षमतेचा NIO करणार अभ्यास

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय; सक्तीच्या नसबंदीला बळी पडलेल्यांना मिळणार नुकसान भरपाई; सरकारला आदेश

SCROLL FOR NEXT