Narendra Modi Lok Sabha Speech
Narendra Modi Lok Sabha Speech Dainik Gomantak
देश

Narendra Modi Lok Sabha Speech: “विरोधकांना सिक्रेट वरदान मिळालंय, ते ज्याचं…”, PM मोदींनी सांगितली 3 उदाहरणं

Manish Jadhav

Narendra Modi Lok Sabha Speech: आज लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेससह विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. जेव्हा-जेव्हा विरोधक काही वाईट करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांच्याकडून चांगलेच घडते.

मला वाटते की, त्यांच्याकडे एक सिक्रेट वरदान आहे. त्यांनी वाईट करण्याचं ठरवलं तरी चागलंच होतं. त्यांचं सगळ्यात मोठं उदाहरण स्व:ता मी आहे.

परंतु विरोधकांच्या सिक्रेट वरदानाचे मी आणखी तीन उदाहरणे देतो, असं पंतप्रधान मोदी यांनी बॅंकिंग क्षेत्र, एचएएल आणि एलआयसी कंपनीची उदाहरणे दिली.

दरम्यान, विरोधकांनी बँकिंग क्षेत्र बुडेल अशी अफवा पसरवली होती. विशेष म्हणजे, परदेशी लोकांना बोलावून त्यांनी खूप अफवा पसरवल्या.

आता देशातील बॅंकिंग क्षेत्राचं काही खरं नाही. त्यांनी मोदी सरकारच्या (Government) काळात बँकेचे वाईट होईल असं म्हटलं होतं. परंतु आता बँकिंग क्षेत्राचे नेट प्रॉफिट दुपटीने वाढले आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

दुसरे उदाहरण देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, संरक्षण क्षेत्रातील हेलिकॉप्टर बनवणारी सरकारी कंपनी एचएएल कंपनीबाबतही खोट्या अफवा पसरवल्या. एचएएल लवकरचं बंद पडेल असं म्हणून कामगारांना भडकवण्यातं आलं, त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. पण आज एचएएल मजबूत स्थितीत आहे.

दुसरीकडे, एलआयसीबाबतही (LIC) विविध अफवा विरोधकांनी पसरवल्या, एलआयसीमधील गरिबांचे पैसे बुडाले. पण आज एलआयसी उत्तुंग शिखरे गाठत आहे. सरकारी कंपनीमध्ये पैस गुंतवण्याचा सल्ला देत आहेत, असं म्हणत पंतप्रधानांनी तिसरे उदाहरण दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Live Update: चिखलीत इनडोअर स्टेडियमची भिंत कोसळली

Jammu & Kashmir Terrorist Attack: कठुआमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; भारतीय लष्कराचे 4 जवान ठार, 6 जखमी

Nilesh Cabral: निलेश काब्राल यांचा थेट CM पदावरच डोळा?; मंत्रिमंडळ फेररचनेच्या पार्श्वभूमीवर मोठे विधान

Goa Rain Update: राज्यात पावसाचा हाहाकार! कुशावती नदीची पातळी वाढली; पारोडा रस्ता दुसऱ्या दिवशीही पाण्याखाली

Mumbai Goa Highway: निवारा शेडविना प्रवाशांचे हाल; पेडणे तालुक्याची समस्या

SCROLL FOR NEXT